Bharat Jodo Yatra Live Updates : भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील पाचवा दिवस; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेला मनसेनं विरोध केला आहे.
LIVE
Background
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Live Updates : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 73 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 13 वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा पाचला दिवस आहे. काल यात्रेनं अकोल्यातून शेगावमार्गे बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केलाय. आज सकाळी ही यात्रा शेगावातून बुलडाणा जिल्ह्यातील जलंब शहरात आलीय. भारत जोडो यात्रा आज सकाळी शेगाव वरून सकाळी 6 वाजता निघाली. सकाळी 10 वाजता राहुल गांधी हे शेगाव वरून जलंब या गावी पोहचली. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या घरासमोर सुंदर रांगोळी काढली तर काही महिलांनी फुलांची रांगोळी काढली. ग्रामीण भागात भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या सभेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा यांच्याससह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
मनसे शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवणार
राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. त्यानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनीकांना 149 ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Bharat Jodo Yatra Dhule : भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर रॅलीचं आयोजन
Bharat Jodo Yatra : महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेचा 13 वा दिवस
काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) 73 वा दिवस असून, महाराष्ट्रातील यात्रेचा 13 वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा पाचला दिवस आहे. काल यात्रेनं अकोल्यातून शेगावमार्गे बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केलाय. आज सकाळी ही यात्रा शेगावातून बुलडाणा जिल्ह्यातील जलंब शहरात आलीय.
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील पाचवा दिवस
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातील पाचवा दिवस
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज विदर्भातला पाचवा दिवस आहे. आज स्वर्गीय इंदिरा गांधी यांची जयंती ही आहे त्यानिमित्त राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने उद्या देशव्यापी बँक संप मागे, उद्याला देशभरातील बॅंका सुरु राहणार
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने उद्या देशव्यापी बँक संप मागे, उद्याला देशभरातील बॅंका सुरु राहणार
कर्मचाऱ्यांच्या मागील 5 वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बॅंक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाचा होणार
मुख्य कामगार आयुक्तां(केंद्र) सोबत बॅंक संघटनांच्या झालेल्या बैठकीत निर्णय
आऊटसोर्सिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बॅंकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही
सोबतच बॅंकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीनं करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा होता बॅंकिंग संघटनांचा आरोप
काही बॅंकांचे कर्मचाऱ्यांसोबत असलेल्या वादावर देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांचा पुढाकार