एक्स्प्लोर

दुसऱ्या दिवशीही बेस्टचा संप सुरुच

संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच राहिल. त्यामुळे विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची आजही हाल होण्याचे चिन्हे आहेत. काल बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संपच सुरुच राहणार आहे.

मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. त्यामुळे विद्यार्थी, ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह मुंबईकरांची आजही हाल होण्याचे चिन्हे आहेत. काल बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संपच सुरुच राहणार आहे. शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने काल संपातून माघार घेतली होती. सुरुवातीला कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी कामावर रुजू होणार ,अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र मुंबई सेंट्रल व्यतिरिक्त अजून कोणत्याही बस डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही.  तर शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास यांनी इतर बस डेपोमध्ये कर्मचाऱ्यांना जाण्यापासून काही कर्मचारी रोखत आहेत, असा आरोप केला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संपाचा आज दुसरा दिवस आहे. काल बेस्ट प्रशासन आणि कर्मचारी संघटना यांच्यात बैठक झाली होती. परंतु यात कोणताही तोडगा न निघाल्याने संप सुरुच ठेवण्याचा निर्णय संघटनांनी घेतला होता. बेस्टच्या संपामुळे काल दिवसभर प्रवाशांचे हाल झाले होते. आजही हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी आजही बैठकांचे सत्र कायम राहील. दुसऱ्या दिवशीही संप सुरुच असल्याने प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय  घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. संपाला फुटीचे ग्रहण या संपाला फुटीचं ग्रहण लागताना काल दिसून आले. काल शिवसेनाप्रणित बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेतली होती. सुरुवातीला कामगार सेनेचे 11 हजार कर्मचारी कामावर रुजू होणार, अशी घोषणा करण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांनीच कामावर जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या संघटनेत असलेला बेबनाव समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या निर्णयामुळे शिवसेना तोंडावर आपटण्याची चिन्हे आहेत. मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना दिलासा सध्या मुंबई विद्यापीठाअंतर्गत विविध विषयांच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने बेस्टच्या संपाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला विद्यार्थी उशिरा पोहोचले तरी त्यांना परीक्षेला बसू द्यावे, अशा सूचना महाविद्याल्यांना दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बेस्टचा संप, टॅक्सीचालकांची मुजोरी बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काल टॅक्सीचालकांची मुजोरी पाहायला मिळाली. टॅक्सीचालक प्रवाशांकडून चौपट दर वसूल करत आहेत. मीटर किंवा शेअर टॅक्सीच्या दरांऐवजी प्रतिप्रवासी भाडे आकारणी करुन मुंबईकरांची पिळवणूक सुरु आहे. भायखळा ते जेजे ब्रीज या एक ते दीड किमी अंतरासाठी तब्बल 80 रुपये भाडं आकारलं जात आहे. शिवाय खाजगी बसही जादा पैसे प्रवाशांकडून घेत आहेत. त्यामुळे अनेकजण जवळच्या प्रवासासाठी लिफ्ट घेऊन प्रवास करत होते. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या - बेस्टचा 'क 'अर्थसंकल्प मुंबई पालिकेच्या 'अ 'अर्थसंकल्पात विलीन करण्याबाबत मंजूर ठरावाची त्वरित अंमलबजावणी करणे - 2007 पासून बेस्ट उपक्रमात भरती झालेल्या कर्मचाऱ्यांची 7,390 रु. सुरू होणाऱ्या मास्टर ग्रेडमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने वेतन निश्चिती केली जावी - एप्रिल 16 पासून लागू होणाऱ्या नवीन वेतनकरारावर तातडीने वाटाघाटी सुरू करणे - 2016-17आणि 17-18 साठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस - कर्मचारी सेवा निवासस्थानांचा प्रश्न निकाली काढावा - अनुकंपा भरती तातडीनं सुरु करावी
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pothole Menace: पुणे-बंगळूर महामार्गावर खड्ड्यांमुळे अपघात, दुचाकी घसरल्याचा थरारक Video समोर
Pune Car Crash: 'हँडब्रेक ओढल्यामुळे' गाडी पिलरला धडकली, Pune तील दोन चुलत भावांचा जागीच मृत्यू
Womens World Cup Final नवी मुंबईत भारत विरुद्ध द. आफ्रिका लढत रंगणार, विश्वविजयासाठी टीम इंडिया सज्ज
Womens World Cup Final: वनडे वर्ल्डकपमध्ये भारत वि. द.आफ्रिकेत लढत, पावसामुळे सामन्याला उशीर
NEP Debate: 'पहिलीपासून Hindi सक्ती नको, पाचवीपासून सुरू करा', Dr. Narendra Jadhav यांचे स्पष्ट मत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!
Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
मुंबई उच्च न्यायालयात स्टेनोग्राफर पदासाठी भरती, पगार 1.77 लाख रुपयांपर्यंत
Nashik Crime: लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
लहान मुलांच्या भांडणावरून राडा; किरकोळ वाद थेट गोळीबार अन् हाणामारीपर्यंत पोहोचला, मालेगावमध्ये नेमकं काय घडलं?
IPL 2026: आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी जबरदस्त ट्रेड होणार; सॅमसन आणि केएल राहुलच्या नवीन टीमचा खुलासा!
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
ट्रम्प 2.0 मध्ये भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे 91 टक्क्यांनी वाढले; एच-1बी व्हिसा धारकांनाही धमक्या; मंदिरेही टार्गेट
Nashik Politics: पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
पहिल्यांदा भाजपकडून रेड कार्पेट अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून तत्काळ हकालपट्टी; नाशिकमध्ये काय घडतंय?
India Women vs South Africa Women, Final: कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
कपिल, धोनी आणि आता हरमनप्रीत! भारतीय महिला संघ आज इतिहास रचणार का? लॉर्ड्सवरील स्वप्न नवी मुंबईत पूर्ण होणार?
Embed widget