मोठी बातमी! अजित पवारांची बीडमधील उत्तर सभा रद्द होण्याची शक्यता; हे आहे कारण?
Sharad Pawar VS Ajit Pawar: 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये अजित पवारांची होणारी सभा आता रद्द होण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar VS Ajit Pawar: शरद पवारांनी (Sharad Pawar) बीड (Beed) जिल्ह्यात सभा घेतल्यावर त्यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांची (Ajit Pawar) सभा होणार होती. मात्र, आता अजित पवारांची ही उत्तर सभा रद्द होण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाच्या झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून, बीडची उत्तर सभा रद्द करण्यात आल्याचा निर्णय यावेळी घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये अजित पवारांची होणारी सभा आता रद्द होण्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असे दोन पाहायला मिळत आहे. दरम्यान, शरद पवार यांच्याकडून अजित पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या जिल्ह्यात जाहीर सभा घेण्यात येत आहे. तर बीडमध्ये देखील शरद पवार यांची 17 ऑगस्ट रोजी सभा झाली. त्यामुळे शरद पवारांच्या याच सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवारांची 27 ऑगस्ट रोजी उत्तर सभा होणार होती. मात्र, आता अजित पवारांची सभा रद्द होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे
यामुळे सभा रद्द?
शरद पवारांच्या बीडमधील सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झाली होती. त्यानंतर शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभा घेण्याचे ठरले होते. त्यामुळे शरद पवारांच्या बीडच्या सभेनंतर उत्तर सभेचं धनंजय मुंडे यांच्यावतीने अयोजन करण्यात येणार होते. मात्र, बीडच्या सभेत शरद पवारांनी आपल्या भाषणात अजित पावर किंवा धनंजय मुंडे यांच्यावर टीका करण्याचे टाळले. दरम्यान, आता अजित पवार गटाच्या झालेल्या एका बैठकीत यावर चर्चा झाली. ज्यात, शरद पवारांनी कोणतेही टीका केली नसताना त्यांना उत्तर काय देणार? यावर चर्चा झाली. त्यामुळे 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणारी अजित पवारांची उत्तर सभा रद्द होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पवारांच्या सभेत पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप?
दरम्यान. 17 ऑगस्ट रोजी बीडमध्ये झालेल्या शरद पवारांच्या सभेत पैसे देऊन लोकांना जमवल्याचा आरोप होत आहे. तर, काही महिला पैसे वाटप करत असल्याचे देखील तथाकथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात पवारांच्या सभेला महिलांना पैसे देऊन आणण्यात आल्याचा दावा केला जात आहे. मात्र, यावर अजून तरी दोन्ही गटाची अधिकृत अशी प्रतिक्रिया आलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
शरद पवारांच्या बीडमधील सभेविरोधात अजित पवारांची उत्तर सभा? धनंजय मुंडेंकडून सभेचं आयोजन