(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Beed : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, अंबाजोगाई सत्र न्यायालयाचा निकाल
एकदा जामीनावर सुटका झाल्यानंतरही आरोपीने दुसऱ्यांदा त्याच अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
बीड: एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे. केज तालुक्यातील साबळा या गावातील अशोक सरवदे हा तो गुन्हेगार आहे तो विवाहित आहे.
लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेणाऱ्या या आरोपीच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीनावर बाहेर सोडल्यानंतर या आरोपीने त्या पीडित अल्पवयीन मुलीस पुन्हा फूस लावून पळवले होते.
अशोक मारूती सरवदे या विवाहीत असलेल्या आरोपीने आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेते होते. यासंदर्भात गुन्हा दाखल होवून आरोपीस अटकही झाली होती. परंतु जामीनावर सुटल्यानंतर पिडीतेस त्याने पुन्हा एकदा पळवून नेले आणि अल्पवयीन असतानादेखील तिच्यावर वारंवार अत्याचार केला. आरोपी हा काही दिवस या अल्पवयीन मुलीसोबत बायकोसारखा राहात होता.
विशेष बाब म्हणजे सदर आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तरी देखील सदर अल्पवयीन पिडीतेस साबळा, ता. केज येथून पळवून नेले आणि अनेकवेळा बलात्कार केला. सदर फिर्यादीवरून 28 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंद करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरण हे आरोपीस तुरूंगात ठेवूनच चालविण्यात आले. 28 सप्टेंबर रोजी या आरोपीच्या विरोधात केज पोलीस ठाण्यामध्ये पुरन 405/ 2020 कलम 363, 367 (जे) (एन) भादवी सह कलम 468, 10, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.
हे प्रकरण न्यायालयामध्ये सुनावणीला असताना आरोपी मात्र तुरुगांतच होता. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांची साक्ष पुरावे आणि वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दहा वर्ष सक्त मजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अंबाजोगाईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha