एक्स्प्लोर

सरकार सांगतं लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये 800 बेड, प्रत्यक्षात 325 बेडच कार्यान्वित : नमिता मुंदडा

बीडच्या लोखंडी सावरगाव परिसरात सरकारने कोविड केअर सेंटरची उभारणी केली. एक हजार बेडच्या क्षमतेच्या या सेंटरमध्ये 800 बेड उपलब्ध असल्याचे सरकारकडून सांगितलं जातं. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी 325 बेडच उपलब्ध असल्याचा आरोप भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे.

बीड : राज्यातील ग्रामीण भागातील सगळ्यात मोठे सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल हे बीडच्या अंबाजोगाई शहरालगत लोखंडी सावरगाव येथील उभारण्यात आलेले आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयाचे व्हर्चुअल उद्घाटन केले होते तर सामाजिक न्यायमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रिबीन कापून या हॉस्पिटलचे लोकार्पण केले होते.

यावेळी एक हजार बेडच्या क्षमतेच्या या रुग्णालयात 800 बेड उपलब्ध असल्याचे शासनाच्या वतीने सांगितले होते. आज प्रत्यक्षात या ठिकाणी 325 बेडच उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या या हॉस्पिटलला सुसज्ज इमारत लाभली, मात्र तज्ज्ञ डॉक्टरांचा आणि साधनसामुग्रीचा अभाव असल्याने या रुग्णालयात रुग्णसेवेबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहे, असा आरोप भाजपाच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी केला आहे.

रुग्णांची वाढती संख्या आणि अपुऱ्या सुविधांमुळे कोरोनाच्या रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध होत नाही. दर्जेदार सेवा देण्यासाठी शासनाने रिक्त जागा, ऑक्सिजन प्लांट, सिटी स्कॅन मशीन आणि सर्व प्रकारच्या तपासण्या रुग्णालयाला उपलब्ध करुन द्याव्यात. कोरोना रुग्णांसाठी हे रुग्णालय सुसज्ज आणि अत्याधुनिक करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केल्याचं नमिता मुंदडा यांनी सांगितलं.

सरकार सांगतं लोखंडी सावरगावच्या कोविड सेंटरमध्ये 800 बेड, प्रत्यक्षात 325 बेडच कार्यान्वित : नमिता मुंदडा

काय आहेत नमिता मुंदडा यांच्या मागण्या?

1) आज तारखेला 325 बेड रेडी आहेत त्यात 370 बेड अॅडजेस्ट करता येतात. त्यापैकी 267 रुग्ण दाखल आहेत.

2) 448 ऑक्सिजन बेडचा उल्लेख दाखवला आहे, प्रत्यक्षात 140 ऑक्सिजन बेड आहेत. बाकीचे बेड तयार होण्यासाठी वेळ लागणार आहे त्यासाठी पुढील अडचणी येत आहेत

1) ऑक्सिजन प्लांट उभा करणे. 2) नवीन जनरेटर बसवणे. 3) त्या भागात स्ट्रीट लाईट बसवणे. 4) पाण्यासाठी पाच हजार लिटरच्या दहा टाक्या बसवणे. 5) वार्ड बॉय/स्टाफ नर्स/टेक्निशियन यांच्या जागा भरणे. 6) ड्रनेज लाईन करणे. 7) सध्या 67 व्हेंटिलेटर आहेत परंतु त्यासाठी लागणारे भूलतज्ज्ञ/चेस्ट फिजिशियन/फिजिशियन पूर्णवेळ शिफ्ट वाईज आजही नाहीत. 8) सिटीस्कॅन मशीन त्वरित बसवणे.

वरील सर्व अडचणी सोडवल्या तरच 800 बेड तयार होतील अन्यथा 350 बेड आहेत असेच म्हणावे लागेल, असं नमिता मुंदडा यांचं म्हणणं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget