एक्स्प्लोर

धक्कादायक! बीडमध्ये अवैध गर्भपातासाठी वापरलेल्या गोळ्यांचा आणि उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्यांचा बॅच क्रमांक एकच

बीड तालुक्यातील बकरवाडी येथे झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणी (Beed Abortion Case) एका महिलेचा मृत्यू झाला होता.

Beed Latest Update:  बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील (Gevrai Taluka Abortion) बकरवाडी येथे झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणी (Beed Abortion Case) एका महिलेचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला असून महिलेच्या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आणि उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्याचा बॅच क्रमांक एकच असल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून समोर आला आहे.  या गर्भपात प्रकरणात मनीषा सानप या अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी गेवराईतून अटक केली होती. मनीषा सानप हिच्याकडे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्याचा बॅच क्रमांक आणि उपजिल्हा रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या गर्भधारणाच्या गोळ्याचा बॅच क्रमांक एकच आढळून आल्याने बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणानंतर आता औषध प्रशासनाने बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र लिहून गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

बीडच्या (Beed Illegal Abortion)  बकरवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपात प्रकरणात बीड पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. अतिरक्तस्त्रावामुळे सीता गाडे या महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर तपास सुरु असतानाच या गर्भपात प्रकरणी ज्या नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला त्या नर्सचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती.  

बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय

बीडमध्ये पुन्हा एकदा अवैध गर्भपात करणारे रॅकेट सक्रिय झाल्याच्या संशयावरून पोलिस, आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी या प्रकरणाची सखोल तपास करायला सुरुवात केली आहे. पोलीस तपासामध्ये या प्रकरणी मुलीच्या गेवराई मधील एका महिला एजंटला अटक करण्यात आली होती. याच एजंटकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सकाळी बीड शहरातील नर्स असलेल्या सीमा सुरेश डोंगरे आणि मृत महिलेच्या पाच नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला होता. 

आपल्यावर गुन्हा दाखल झाला हे कळल्यानंतर नर्स असलेल्या सीमा डोंगरे फरार होत्या. पोलिस त्यांचा शोध घेत असतानाच बीड ग्रामीण पोलिसांना पालीच्या बिंदुसरा धरणामध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेहाची चौकशी केली असता हा मृतदेह गर्भपात प्रकरणात आरोपी असलेल्या सीमा डोंगरे यांचा असल्याचं निष्पन्न झालं होतं.  

इतर महत्वाच्या बातम्या

Beed : वंशाला दिवा मुलगाच हवा म्हणून परळीत क्रूरतेचा कळस, बळजबरीने गर्भलिंग निदान करून विवाहितेचा गर्भपात

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणाला वेगळं वळण, आरोपी असलेल्या नर्सचा मृतदेह सापडल्याने खळबळ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 January 2025 : आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शुक्रवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Embed widget