Namo Rojgar Melava Live Updates : तरुणांना शिक्षण आणि कौशल्याप्रमाणे रोजगार मिळणार, रोजगार मेळाव्यात 55 हजार पदे सूचित
Baramati Namo Rojgar Melava Live Updates : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार असून या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसणार आहेत. या कार्यक्रमासंबंधित सर्व लेटेस्ट अपडेट्स वाचा...
LIVE
Background
Baramati Namo Rojgar Melava Live Updates : आज बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा पार पडणार असून या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार एकत्र दिसणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या कार्यक्रमासंबंधित सर्व लेटेस्ट अपडेट्स वाचा...
Baramati Rojgar Melava 2024 Live : बारामती नमो रोजगार मेळावा लाईव्ह पाहा
Namo Rojgar Melava 2024 Live : बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती पाहायला मिळत आहे.
बारामती नमो रोजगार मेळावा लाईव्ह येथे पाहा
Baramati Namo Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल
नमो रोजगार मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर दाखल
Baramati Namo Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर पोहचले आहेत. काही वेळातच ते विद्या प्रतिष्ठान मैदानाकडे रवाना होतील. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बारामतीत येण्यासाठी उशीर होताना दिसत आहे. साधारण आतापर्यंत कार्यक्रम सुरु व्हायला हवा होता. दोन्ही उपमुख्यमंत्री बारामतीत पोहचले आहे आता मुख्यमंत्र्यांच्या येण्याची प्रतिक्षा आहे.
Baramati Namo Rojgar Melava : नमो रोजगार मेळाव्यासाठी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार कार्यक्रमस्थळी दाखल
Baramati News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी उद्घाटने ऑनलाइन पध्दतीने
Baramati Namo Raojgar Melava : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी उद्घाटने ऑनलाइन पध्दतीने होणार
नमो रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालय, बारामती बस स्थानक आणि पोलीस वसाहतीचे होणार ऑनलाईन पध्दतीने उद्घाटन
बारामती विमान तळावर उतरल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर
बारामतीत नमो रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनासाठी येणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री