एक्स्प्लोर
Advertisement
बत्तीस नाही, तीस दोन! बालभारतीच्या संख्यावाचनातील बदलावर शिक्षक आमदार संतापले
कितीही खर्च झाला तरी मराठीची पुस्तकं बदलली पाहिजेत, अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली.
मुंबई : बालभारतीच्या इयत्ता दुसरीतील गणिताच्या पुस्तकात नवे बदल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात. 21 ते 99 हे आकडे आता यापुढे जोडाक्षराप्रमाणे नाही, तर संख्यावाचनाप्रमाणे शिक्षकांनी शिकवायचे आहेत. म्हणजेच 32 या आकड्याचा थेट बत्तीस असा उल्लेख न करता 'तीस दोन' असा उल्लेख करावा लागेल. यावरुन विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं आहे.
जोडाक्षरामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम होत असून गणिताची नावड निर्माण होत असल्याचं बालभारतीचं म्हणणं आहे. शिवाय इंग्रजीसोबतच कानडी, तेलगू, तामिळ भाषांमध्येही अशाच प्रमाणे शिक्षण होत असल्याचं बालभारतीनं सांगितलं आहे.
बालभारतीने नव्याने संख्यावाचनाबाबत केलेला बदल खेदजनक असल्याची प्रतिक्रिया शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांना गणित हा कायम कठीण विषय वाटतो. तो सोपा कसा करता येईल, याबाबत विभागाने प्रयत्न करायला हवा. मात्र तसं न करता परंपरागत संख्यावाचन बदलण्याचा घाट कोण आणि का घालत आहे, याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काळे सभागृहात करणार आहोत.
शिक्षणामध्ये आतापर्यंत जे जे विनोद झाले आहेत, जे काही झालं आहे ते आता नव्या शिक्षण मंत्र्यापुढे वाढून ठेवलं आहे, असा टोला शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी लगावला. संख्यावाचनाची ही नवी पद्धत चुकीची आहे. मराठी भाषा मारायला हे निघाले आहेत. एकीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असताना हे काहीतरी वेगळं सुरु असल्याचं ते म्हणाले. कितीही खर्च झाला तरी मराठीची पुस्तकं बदलली पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.
ग्रामीण भागातल्या मुलांना खरं शिक्षण मिळतं का ? एक मास्तर चार वर्ग चालवतात अशी परिस्थिती आहे. या मूलभूत प्रश्नाला हात घालण्याऐवजी हे काय चाललं आहे? असा सवाल आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement