एक्स्प्लोर

Bakri-Eid 2021 :आज बकरी ईद... मुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून  ‘ईद-उल-अजहा’ च्या शुभेच्छा

रमजाननंतर जवळपास दोन महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते. मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून  ‘ईद-उल-अजहा’ च्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

मुंबई : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच आजचा दिवस साजरा केला जात आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजाननंतर जवळपास दोन महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते.  मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, राज्यपालांसह दिग्गजांकडून  ‘ईद-उल-अजहा’ च्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

आपण परस्परांविषयी आदर बाळगूया-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ईद-उल-अजहा’ अर्थात बकरी ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट रोखण्यासाठी हा सण घरीच राहून साजरा करा, यातून आपले कुटुंबीय आणि परस्परांची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे. ‘ईद-उल-अजहा’ त्याग, समर्पणाचा संदेश देणारा आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्परांविषयी आदर बाळगूया,’ असेही मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.

Eid al-Adha 2021 : आज देशात साजरी केली जातेय बकरी ईद, जाणून घ्या या दिवसाचे महत्व

‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो -राज्यपाल 
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना ‘बकरी ईद’ निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘बकरी ईद’ हा पवित्र सण श्रद्धा, प्रेम, बंधुभाव व त्यागाचा संदेश देतो. हा  सण साजरा करताना सेवाकार्य तसेच उपेक्षित जनसामान्यांच्या कल्याणाचा विचार केला जातो, ही अतिशय समाधानाची बाब आहे. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत सर्वांनीच गोरगरीब बांधवांच्या हिताचा विचार करणे आवश्यक झाले आहे. बकरी ईदनिमित्त मी राज्यातील सर्व लोकांना विशेषतः मुस्लिम बंधू – भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो,  असे राज्यपाल  कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. 

नियमांचं पालन करून बकरी ईद साजरी करा-उपमुख्यमंत्री 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. शांती आणि त्यागाचे प्रतिक असलेली ‘बकरी ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, बंधुता, सौहार्द वाढीस लागो, यंदाची बकरी ईद राज्यावरचं कोरोना संकट दूर करणारी ठरो, अशा शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर ‘बकरी ईद’सह सर्व सण पूर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वासदेखील उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Jalna : माझा जीव गेला तरी न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाहीVaibhavi Santosh Deshmukh माझ्या वडिलांना का मारलं.. संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावरMaharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 10 Jan ABP MajhaSudhir Mungantiwar PC : शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, सुधीर मुनगंटीवारांच वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Delhi Assembly Elections 2025 : लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
लोकसभेला सख्ख्या भावाप्रमाणे लढले, दिल्लीच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पक्के वैरी झाले, काँग्रेस अन् 'आप'ने एकमेकांना शिंगावर घेतलं
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
खरी शिवसेना ठाकरेंचीच! भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा, महायुतीत ठिणगी?  
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
मी 4 वेळा मिनी पाकिस्तानमधून निवडून आलोय; नितेश राणेंसमोर भाजप आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य
Yuzvendra Chahal : लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
लग्न नेमकं कोणामुळं मोडतंय? धनश्री प्रतीकसोबत दिसली, दुसरीकडे युझवेंद्र चहलही मिस्ट्री गर्लसोबत चेहरा लपवताना झाला स्पॉट!
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
वारी... मुंबई ते शिर्डी पदयात्रा, API ने 230 किमी अंतर कापलं; साईदर्शन 10 किमीवर असतानाच दुर्दैवी मृत्यू
Nylon Manja : धक्कादायक... नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये महिनाभरात 9 गंभीर घटना, दोघांचा दुर्दैवी अंत, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Santosh Deshmukh Case : पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
पप्पा... जिथे असाल तिथे हसत रहा, आम्हाला माफ करा, तुम्हाला वाचवू शकलो नाही; संतोष देशमुखांच्या लेकीला अश्रू अनावर
Embed widget