Singer Anandi Joshi: 'हिचे क्लिवेज बघ किती डिप', पुण्यातल्या बालरोगतज्ज्ञाची गायिकेच्या फोटोवर कमेंट; दुसऱ्याला पाठवायला गेला अन् तो मेसेज तिलाच सेंड झाला, पोस्ट करत म्हणाली...
Singer Post Pune Doctor : गायिकेने पोस्टमध्ये लिहिले की, “कलाकार असलो म्हणून कोणालाही आमच्याशी अशा प्रकारे वागण्याचा अधिकार नाही. आम्हीही माणूस आहोत.

मुंबई: मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही वेळा त्यांच्या दिसण्यावरून किंवा कपड्यांवरून लोक नाव ठेवतात. अनेक कलाकार हे दुर्लक्ष करून शांत राहतात, पण कधी कधी मर्यादा ओलांडल्या गेल्या तर ते आवाज उठवतात. अशाच प्रकारची घटना अलीकडेच एका प्रसिद्ध गायिकेसोबत (Singer Anandi Joshi) घडली. एका व्यक्तीने तिचा फोटो त्याच्या मैत्रिणीला पाठवायचा म्हणून शेअर करायचा होता, पण चुकून तो फोटो थेट त्या गायिकेलाच पाठवला. यानंतर त्याने तिच्याबद्दल असभ्य आणि नकोशी कमेंट केली. ही कमेंट पाहिल्यानंतर गायिका संतापाली. तिने लगेचच सोशल मीडियावर संपूर्ण घटना सांगितली आणि अशा वागणुकीचा तीव्र निषेध केला. गायिकेने पोस्टमध्ये लिहिले की, “कलाकार असलो म्हणून कोणालाही आमच्याशी अशा प्रकारे वागण्याचा अधिकार नाही. आम्हीही माणूस आहोत. (Singer Anandi Joshi instagram story)
Singer Post Pune Doctor : क्लिवेज बघ किती डीप आहे...
ही घटना घडली ती गायिका म्हणजे मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधून प्रसिद्ध झालेली आनंदी जोशी (Singer Anandi Joshi)आहे. आनंदीने तिच्या सोशल मिडीया इंस्टाग्राम स्टोरीवर ही धक्कादायक घटना शेअर केली आहे. सोबतच तिने फोटोदेखील शेअर केले होते.गायिका आनंदी (Singer Anandi Joshi) हिने आपल्या इंस्टाग्रामवर पहिल्या स्टोरीमध्ये एका व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यावर कॅप्शन देत लिहिले की हा व्यक्ती गेल्यावर्षी माझ्या कॉन्सर्टसाठी आला होता. त्याने त्यावेळी माझ्यासोबत काढलेला हा फोटो सुद्धा पोस्ट केला आणि मला पर्सनलला मेसेज करून तो माझ्या कामाचं माझं खूप कौतुक सुद्धा करत होता आणि आज सकाळी मी पाहते तर मला हा मेसेज दिसला. त्यानंतर आनंदीने दुसऱ्या स्टोरीमध्ये एक स्क्रीनशॉट शेअर केलेला. ज्यामध्ये आनंदीचाच एक फोटो होता आणि खाली लिहिलेले की क्लिवेज बघ किती डीप आहे.त्यानंतरच्या पुढच्या स्टोरीमध्ये गायिका आनंदीने म्हटलं आहे की, खरंतर त्याला हा फोटो त्याच्या दुसऱ्याच मित्राला कोणालातरी पाठवायचा होता. पण त्याने तो चुकून मलाच पाठवला. मी त्याला मेसेजही केला की तू चुकून मलाच मेसेज केला आहेस का? मग त्याने तो मेसेज डिलीट केला.

Singer Post Pune Doctor : लोकांनी सांभाळून राहावं. तुमच्या मुलांची काळजी घ्यावी
पुढे तिने म्हटलं आहे की, त्याने मला काय मेसेज केले त्याबद्दल हे सर्व नाही. तर हे एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician)बद्दल आहे. जो एका मुलीला एक व्यक्ती म्हणून पाहणं टाळतो आणि तिच्या शरीरावरती असं बोलतो. त्याला मुलांच्या शरिराला स्पर्श करण्याचा अधिकार आहे. बोलू शकत नसलेल्या आणि स्वतःचा बचाव करू शकत नसलेल्या बाळांना आणि लहान मुलांसोबत संपर्क साधण्याची त्याला परवानगी असते. ही गोष्ट मला खरंच भीतीदायक वाटते आहे. लोकांनी सांभाळून राहावं. तुमच्या मुलांची काळजी घ्यावी. तुम्ही म्हणाल की, मी असं वागणाऱ्या लोकांना किंवा त्यांच्या कमेंटवरती दुर्लक्ष करावं, तर मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे की, असं जर केलं तर त्यांना वाटेल की त्यांचं वागणं अगदी साधं, ठिक आहे. हे असे लोक आहेत, ज्यांच्यामध्ये महिला, मुले आणि प्राण्यांविरुद्ध गुन्हे करण्याची क्षमता आहे. जर आपण त्यांच्या अशा कृतींकडे लक्ष दिले तर आपण त्यांना ओळखू शकतो. आपण आपल्यासाठी संभाव्य धोका टाळू शकतो. त्यानंतर आनंदीने त्या कमेंट करणाऱ्या क्लिनिकचा पत्ता शोधला. त्या व्यक्तीचे नाव कौस्तुभ प्रभुदेसाई आहे, त्याचे बाणेर पुणे येथे क्लिनिक आहे.

Singer Post Pune Doctor : बरं झालं हे घडलं कारण...
आनंदीने म्हटलं आहे की, एका अर्थी बरंच झालं की, हे घडलं. कारण यामुळे मला लोकांचे इंटेन्शन आणि त्यांची विचार करण्याची पद्धत समजली. पण मला एका गोष्टीने धक्का बसला की तो एक बालरोगतज्ज्ञ (Pediatrician) आहे. तो मेडिकल व्यवसायाचा आहे. आपल्या लहान मुलांसाठी लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात. जी मुलं स्वतःला सांभाळू शकत नाहीत किंवा आजारी असतात त्यांना वाचवण्याचा, सांभाळण्याचा त्याला अधिकार आहे.























