एक्स्प्लोर

सांगली जिल्हा बँकेच्या नोकर भरतीत जयंत पाटलांना तगडा झटका; सदाभाऊ खोतांच्या तक्रारीनंतर सीएम फडणवीसांची तत्काळ स्थगिती, नव्याने नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 559 जागांच्या नोकरभरतीला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. भरती प्रक्रिया आता IBPS किंवा TCS या राष्ट्रीय संस्थांमार्फत करण्याचे आदेश देण्यात आले.

Sangli District Central Bank Recruitment: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नोकरभरती प्रकरणी राज्य सरकारने (Sangli DCC Bank Recruitment Scam) झटका दिला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती  बँकेच्या 559 जागाच्या नोकरभरतीला स्थगिती देत नव्याने नोकर भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश बँकेला राज्य सरकारकडून देण्यात आलेत. IBPS ((इंडियन बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) किंवा  TCS (टाटा कन्सलटन्सी सव्हीसेस) यापैकी कोणत्याही एका कंपनीची (Sangli Bank IBPS TCS Recruitment) निवड करण्याबाबत देखील बँकेस राज्य सरकारने आदेश दिलेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी ही माहिती दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील आधीच्या नोकरभरती आणि घोटाळ्याची चौकशी सुरु असतानाच नवीन 561 जणांच्या नोकरभरतीला परवानगी दिल्याने सहकार मंत्री याबाबत बेजबाबदारपणे वागले अशी टीकाही त्यांनी केली.

'IBPS किंवा TCS यापैकी कोणत्याही एका कंपनीची निवड करा' (Devendra Fadnavis Order Sangli Bank) 

सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्र्यांवर केली. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकरभरती पारदर्शक होण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आय.बी.पी.एस किंवा टी सी एस या कंपनीमार्फत नोकरभरती करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सध्या सुरु असलेली पदभरती प्रक्रिया तत्काळ स्थगित करुन ही भरती प्रक्रिया करण्यासाठी सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 21 डिसेंबर 2022 अन्वये निर्देशित केल्यानुसार IBPS किंवा TCS यापैकी कोणत्याही एका कंपनीची निवड करण्याबाबत बँकेस राज्य सरकारने कळवले आहे.

सदाभाऊ खोत आणि पडळकरांची तक्रार (Sadabhau Khot Statement) 

सांगली जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतील नोकर भरतीला स्थगिती दिली आहे, तसेच राज्यातील सर्व सहकारी बँकेतील भरतीसाठी आयबीपीएस व टीसीएस या संस्थाद्वारे भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सहकार विभागाच्या अवर सचिव मंजुषा साळवी यांनी सहकार आयुक्त पुणे यांना आदेश काढले असल्याची माहिती माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक आणि निपक्षपातीपणे पार पडावी, यासाठी आयबीपीएस व टीसीएस या राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थांमार्फत भरती परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. "एका लिपीक उमेदवारासाठी 20 ते 25 लाख व शिपाई उमेदवारासाठी 12 ते 15 लाख रुपये दर असल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वी सन 2011 मध्ये केलेल्या नोकर भरतीत प्रचंड गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत नोकर भरतीत पात्र व योग्य उमेदवार येणे आवश्यक आहे. बँकेच्या संचालकांच्या शिफारशीनुसार होऊ नये, ही देखील मागणी त्यांनी केली आहे."

दोषी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत (Sangli Bank Corruption Case) 

शेतकऱ्यांकडे थकीत राहिल्यास बोजा चढवला जातो, तसा संचालकांच्या घरादारावर बोजा चढवावा, व या दोषींना पुन्हा कधीही निवडणुका लढता येणार नाहीत, असे अपात्र ठरवावे, बोगस संस्था काढून 400 जणांनी बोगस कर्ज उचलले आहेत, कागदावरील संस्थांनी मतदानासाठी नोंद करण्यात आल्या आहेत, त्या अपात्र करून निवडणुका होऊ द्या, तसेच यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणीही सदभाऊ खोत यांनी केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
श्रावणात भाविकांच्या खिशाला कात्री, उपवासाचे पदार्थ महागले, साबुदाणा भगर ते शेंगदाणा, कोणत्या वस्तूला किती दर?
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Nandurbar: आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
आजारी महिलेला बांबूच्या झोळीत टाकलं, तब्बल आठ किलोमीटर पायपीट करत प्राथमिक आरोग्य केंद्र गाठलं; नंदुरबारच्या वेहगी नदीवर पूल नसल्याने वाहत्या पाण्यातून जीवघेणा प्रवास
Embed widget