मला तोंड उघडायला लावू नका, एकनाथ शिंदेंना खासगीत काय बोलता हे सांगू का? बाबासाहेब देशमुखांचा शहाजीबापूंना इशारा
नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजयकीय नेते ऐकमेकांवक आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
Babasaheb Deshmukh on Shahajibapu Patil : नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजयकीय नेते ऐकमेकांवक आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. शहाजीबापू ज्यांना दैवत म्हणता त्या एकनाथ शिंदेंबाबत तुम्ही खासगीत काय बोलता सांगू का? मला तोंड उघडायला लावू नका, असे म्हणत सांगोल्याचे शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना इशारा दिला आहे.
तुम्ही वर्षभर आजारी होतात तेव्हा मी माझी आमदार निवासाची खोली तुम्हाला दिली
बापू तुम्ही खासगी बैठकीत झालेली तुमची आणि माझी चर्चा जाहीर करता मग तुम्ही तुमचे दैवताबाबत म्हणजेच एकनाथ शिंदेंबाबत जे काही मुक्ताफळ उधळलीत ते सांगू का? मला उगीच तोंड उघडायला लावू नका अशा शब्दात आज सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शहाजी बापू पाटील यांना इशारा दिला. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप शेकाप युतीच्या प्रचाराची सांगता सभेत डॉक्टर देशमुख यांनी शहाजी बापूंवर तोफ डागली. तुम्ही वर्षभर आजारी होतात तेव्हा मी माझी आमदार निवासाची खोली तुम्हाला दिली. मी स्वतः डॉक्टर आहे आणि माझ्यावर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे संस्कार आहेत. तुम्ही माझ्यावर टीका करा पण आम्हाला जे शिकवण आमच्या दैवताकडून मिळाली आहे त्यानुसार मी माझ्यापेक्षा वयाने जास्त असणाऱ्या तुमच्यासारख्या वर टीका करणार नाही असे बाबासाहेब देशमुख म्हणाले.
आपण खासगीत बसल्यावर बोललेल्या चर्चा तुम्ही सार्वजनिक केल्या
मात्र आपण खासगीत बसल्यावर बोललेल्या चर्चा तुम्ही सार्वजनिक केल्या आहेत. तशाच चर्चा तुम्ही तुमचे दैवत असणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत देखील तुम्ही माझ्या प्रमाणेच काय स्तुती सुमने उधळली ती मला बोलायला भाग पाडू नका असा थेट इशाराच डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी भाषणात दिला आहे. दरम्यान, त्यांच्या या टीकेनंतर आता शहाजीबापू पाटील नेमकं काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीवरुन राजयकी वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:






















