कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला सापडला हिरा, एकनाथ शिंदेंनी केलं निलेश राणेंचं कौतुक, म्हणाले, मालवण हा सेनेचाच बालेकिल्ला
कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला कोकणात सापडला आहे हिरा असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले.
Eknath Shinde : कोकणात दगड प्रसिद्ध आहे चिरा, शिवसेनेला कोकणात सापडला आहे हिरा असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदार निलेश राणे यांचे कौतुक केले. शिंदे साहेबांना मी सोडलं तर देव मला माफ करणार नाही, अस निलेश राणे म्हणाले होते. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पोटात एक ओठात एक मला जमत नाही. जो काम करतो त्याच्या पाठिशी उभे राहणारा एकनाथ शिंदे असल्याचे ते म्हणाले. निलेश राणे केव्हा घाबरत नाही. नारायण राणे यांचे बाळकडू त्याला मिळालं आहे. एकनाथ शिंदे डॉक्टर नसला तरी अनेक ऑपरेशन केली आहेत. बाळासाहेबांच्या शिवसेनेत निलेश राणे आला आहे. फटाके 3 तारखेला ठेवा, निलेश कडे फटाक्यांची कमी नाही. मालवणचे भविष्य सुधारण्यासाठी निलेश राणे धावून येतो. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे करेगा, कुणी कितीही करा कल्ला मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मालवणचे भविष्य सुधारण्यासाठी निलेश राणे धावून येतो
माझी लाडकी बहीण ममता वराडकर यांना निवडून दया असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. मालवणचे भविष्य सुधारण्यासाठी निलेश राणे धावून येतो. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे करेगा असेही एकनाथ शिंदे म्हणाले. कोणी काहीही बोलूद्या दोन तारखेला शिवसेनेला मतदान करा असे एकनाथ शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणीसाठी आणि भावांसाठी काम करेन रक्ताचा थेंब असेपर्यंत संधी सोडू नका. धनुष्यबाणावरचं बटण दाबून मालवणवर भगवा फडकवा असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजना ही माझी सर्वात आवडती योजना
पुढचं भवितव्य समोर ठेऊन काम करायचे आहे. मी जे बोलले तो करतो. जे होणार नाही ते बोलत नाही. दिलेला शब्द पाळणार आहे. फक्त तुम्ही मात्र 2 तारखेला काय करायचे ते लक्षात ठेवा असे एकनाथ शिंदे म्हणाले. सगळीकडे लाडक्या बहिणीची उपस्थिती जास्त आहे. मी मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना कार्यकर्ता म्हणून काम केलं. अनेक योजना आणल्या. सगळ्यात लाडकी बहीण योजना माझी आवडती. आम्ही टीम म्हणून काम करून ही योजना सुरू झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. सगळीकडे लाडक्या बहिणीची उपस्थिती जास्त आहे. कोणी मायकलाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे.
निलेश राणे मालवण चा प्रस्ताव द्या, मालवणचा कायापालट करु
शिक्षणासाठी एका मुलीने आत्महत्या केली. आपली सत्ता असल्याचं उपयोग काय. म्हणून उच्चशिक्षण मुलीना मोफत केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. कोकणी माणूस फणसासारखा बाहेरुन काटेरी आणि आतून गोड. म्हणून शिवसेनेची कर्मभूमी आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वात नारायण राणे मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प आले. उदय सामंत यांना अनेक सभेत फोन करून उद्योग मंत्री म्हणून उद्योग वाढवण्याचे काम करण्यासाठी फोन केले. पक्षासाठी, आपल्या मतदानासाठी जीवाच रान करत आहेत. अनेक प्रकल्प आपल्याला इकडे करायचे आहेत. निलेश राणे मालवण चा प्रस्ताव दया. मालवणचा कायापालट करू असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























