ओबीसींनो घाबरून जाऊ नका, आम्ही मुंबईकडे कूच...; मराठा आरक्षणावर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया
Babanrao Taywade : 'ओबीसींनो घाबरून जाऊ नको, सगेसोयरे संदर्भात शासनाने काढलेला जीआर म्हणजे, जुनीच बाब नव्याने सांगण्यात आली आहे.
Babanrao Taywade On Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या संपूर्ण मागण्या सरकारने मान्य केल्या असून, सगेसोयरे बाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. दरम्यान, यावर आता ओबीसी नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील येत आहे. तर, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंची (Babanrao Taywade) देखील आवर प्रतिक्रिया आली आहे. 'ओबीसींनो घाबरून जाऊ नका, सगेसोयरे संदर्भात शासनाने काढलेला जीआर म्हणजे, जुनीच बाब नव्याने सांगण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईकडे कूच करण्याची गरज नसून, मुंबईतील आंदोलन रद्द करण्यात येत असल्याचे तायवाडे म्हणाले आहेत.
याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले आहे की,“ सगेसोयरे संदर्भात शासनाने काढलेला जीआर म्हणजे, जुनीच बाब नव्याने सांगणे असे आहे. वडील, आजोबा, पणजोबा यांच्याकडील नातेवाईक म्हणजे सगेसोयरे हे आधीच प्रचलित नियम आहे. त्यामुळे शासनाने जुन्या नियमाचा पुनरुच्चार केला आहे. यापलिकडे काही नसल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
सरकारने ओबीसी समाजाला दिलेलं आश्वासन मोडलेले नाही
तर, निर्गमित केलेल्या 37 लाख कुणबी प्रमाणपत्रांची तारीख सांगा, निर्गमित केलेले 37 लाख प्रमाणपत्र 1994 नंतर आजवर दिले आहे, की जरांगेचं आंदोलन सुरू झाल्यापासून देण्यात आले हे सरकारने स्पष्ट करावे. कुणबी किंवा ओबीसी बांधवांनी घाबरून जाऊ नयेत. सरकारने ओबीसी समाजाला दिलेलं आश्वासन मोडलेले नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. तर, आधीच प्रचलित नियमांच्या आधारे प्रमाणपत्र दिले जात असून, 37 लाख पैकी 99 टक्के लोकांकडे आधीच प्रमाणपत्र होते. त्यामुळे माझा आत्मविश्वास आहे की, कुणबी किंवा ओबीसी समाजाचा कुठेही नुकसान होत नाही. आमचा कोणताही नुकसान होत नसल्यामुळे आम्ही सध्या तरी कोणताही आंदोलन करणार नाही. आम्ही मुंबईकडे कूच करणार नाही, असेही बबनराव तायडे म्हणाले आहेत.
'मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले'
मराठा आरक्षणाचा अध्यादेश सरकराने काढला आहे. मराठा समाजाच्या लढाईला यश मिळाले असल्याची घोषणा देखील मनोज जरांगे यांनी केली. दरम्यान, आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 'मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले' असल्याचे हरिभाऊ राठोड म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! मनोज जरांगेंनी 'मराठा आरक्षणा'ची लढाई जिंकली; रात्री नेमकं काय घडलं?