एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादेत उघड्यावर शौचाला बसणाऱ्या 27 जणांना अटक
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये उघड्यावर शौचाला बसणाऱ्या नागरिकांची पोलिसांनी चांगलीच गोची केली. सिल्लोडमध्ये उघड्यावर शौचाला बसणाऱ्या 27 जणांना आज अटक करण्यात आली.
सिल्लोड नगरपालिकेचं गुड मॉर्निंग पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. अटक केल्यानंतर या सर्वांना न्यायालयात हजर करण्यात आलं.
न्यायालयानं अटक करण्यात आलेल्यांकडून प्रत्येकी 400 रुपयांचा दंड वसूल केला. यापुढे उघड्यावर शौचाला बसू नका, अशी तंबी देऊन न्यायायालयानं सर्व 27 जणांची सुटका केली.
उघड्यावर शौचाला बसू नये, घरात शौचालय बांधावं, असं आवाहन वारंवार शासनाकडून केलं जातं. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत नागरिकांना आवाहन करुनही अनेक जण जुमानत नसल्याने कारवाई केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
राजकारण
विश्व
Advertisement