एक्स्प्लोर
..तेव्हा दरवाजा उघडा, कुटुंबाला संपवत तरुणाची आत्महत्या
कृष्णा देवरेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत 'पोलिसांना फोन लावा, तेव्हा दरवाजा उघडा, राम राम राम राम ' असं म्हटलं आहे.

औरंगाबाद: पत्नी आणि दोन मुलींची हत्या करुन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादेत घडली. कृष्णा तात्याराव देवरे असं कुटुंब संपवून गळफास घेणाऱ्याचे नाव आहे. 30 वर्षीय कृष्णा देवरेने 4 आणि 6 वर्षाच्या मुलींना गळफास लावून ठार केलं. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात कुदळ मारुन हत्या केली आणि स्वत:ही गळफास घेतला. फुलंब्री तालुक्यातील सताळ पिंपरी इथं ही थरारक घटना घडली. एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांची नावे सर्वदा कृष्णा देवरे (६) हिंदवी कृष्णा देवरे (४) शिवकन्या कृष्णा देवरे (२७) कृष्णा तायेराव देवरे (३०) आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी दरम्यान, कृष्णा देवरेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत 'पोलिसांना फोन लावा, तेव्हा दरवाजा उघडा, राम राम राम राम ' असं म्हटलं आहे. या चिठ्ठीतील मजकुराचा अर्थ काय आणि कृष्णाने स्वत:सह कुटुंबाला का संपवलं, असा सवाल उपस्थित होत आहे.
आणखी वाचा























