एक्स्प्लोर
सूनेसोबत अनैतिक संबंधात अडथळा, वडिलांकडून मुलाची हत्या
सूनेसोबत अनैतिक संबंध ठेवण्यात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची पित्याने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत घडला आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. सूनेसोबत अनैतिक संबंध ठेवण्यात अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची पित्याने निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील केळगावमध्ये ही घटना घडली.
66 वर्षीय दादाराव कोल्हे यांचे आपल्याच सुनेसोबत अनैतिक संबंध होते. मात्र या संबंधांमध्ये 45 वर्षांचा मुलगा प्रभाकर अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपीने मुलाचा काटा काढण्याचं ठरवलं.
प्रभाकर यांची हत्या करुन आरोपीने मृतदेहाचे तुकडे केले आणि उकिरड्यात पुरले. त्यानंतर आपला मुलगा 14 तारखेपासून बेपत्ता असल्याची तक्रार स्वतः आरोपी वडिलांनीच दिली.
फिर्यादीनुसार औरंगाबादेतील सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र तपासामध्ये पित्यानेच मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आणि पोलिसही चक्रावून गेले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement