एक्स्प्लोर
वाळू माफिया बेलगाम, बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच वाळू माफिया अवैध पध्द्तीने वाळू उपसा करतात. या माफियांवर महसूल विभागाचा वचक राहिलेला दिसून येत नाही. आजच्या कारवाई करताना पोलीस अधिकारी बरोबर असणं गरजेचं होतं, मात्र या कारवाई पोलीस बरोबर नव्हतेय घटना घडल्यावर पोलिसांना फोन लावून बोलवण्यात आले.
इंदापूर : वाळू माफियांवर बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना कारवाई करत असताना इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली धडकवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना इंदापूरमध्ये घडली. मात्र यात सुदैवाने तहसीलदार सोनाली मेटकरी आणि महसूलचे कर्मचारी बालांबल बचावले आहेत. या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून यात एकास अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, तहसीलदार सोनाली मेटकरी आणि महसूलचे अधिकारी हे त्यांचे सरकारी वाहनाने जात होते. यावेळी उजनी जलाशयातून कालठण नंबर दोनकडून इंदापूरकडे वाळूने भरलेला ट्रॅक्टर येत असताना तो ट्रॅक्टर त्यांनी थांबविण्यास सांगितला. मात्र ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर थांबविला नाही.
दरम्यान कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठलाग करीत असताना या ट्रॅक्टरमधील एकाने त्यांना तुमच्या सरकारी जीपवर ट्रॅक्टर घालून तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिली. तेवढ्यात दुसऱ्याने अपघात घडविण्याच्या हेतूने ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीची पीन काढून ट्रॅक्टर तसाच पुढे नेला. त्यामुळे ट्रॉली थेट तहसीलदार यांच्या जीपवर येऊन धडकली. यावेळी जीपमधून काही अधिकाऱ्यांनी तातडीने उड्या मारल्या. सुदैवाने जीपमधील तहसीलदार सोनाली मेटकरी या थोडक्यात बचावल्या.
उजनीच्या पाणलोट क्षेत्रात नेहमीच वाळू माफिया अवैध पध्द्तीने वाळू उपसा करतात. या माफियांवर महसूल विभागाचा वचक राहिलेला दिसून येत नाही. आजच्या कारवाई करताना पोलीस अधिकारी बरोबर असणं गरजेचं होतं, मात्र या कारवाई पोलीस बरोबर नव्हतेय घटना घडल्यावर पोलिसांना फोन लावून बोलवण्यात आले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement