एक्स्प्लोर
Advertisement
आईने पब्जी गेम खेळू न दिल्याने मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गंगापूर पोलिसांनी याबाबत आकाशच्या आई-वडीलांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नाशिक : आईने पब्जी गेम खेळू दिले नाही म्हणून 14 वर्षीय मुलांने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. आकाश ओस्तवाल असे मुलाचे नाव असून सातपूर परिसरातील शिवाजी नगरमध्ये तो वास्तव्यास आहे.
आकाश हा शुक्रवारी संध्याकाळी आपल्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. यावेळी त्याच्या आईने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला. दरम्यान आईने गेम खेळताना मोबईल हिसकाऊन घेतल्याने रागात आकाशने विषारी औषधाचे सेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. गंगापूर पोलिसांनी याबाबत आकाशच्या आई-वडीलांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.
सध्या पब्जी या गेमचा मुलांमध्ये फार आकर्षण आहे. त्यामुळे पालक परेशान आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये या गेमवर बंदी घालण्यात आली आसून गेम खेळणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्रातही पब्जी गेमवर बंदी आणली जाणार का? असा सवाल केला जात आहे.
हिंगोलीत पब्जी गेम खेळण्यात दंग दोन मित्रांना रेल्वेने चिरडले
हिंगोलीत पब्जी गेम खेळण्यात दंग असलेल्या दोन मित्रांना रेल्वेने चिरडले. नागेश गोरे (22) आणि स्वप्नील अन्नपुर्णे (24) अशी मृत युवकांची नावे आहेत. नागेश आणि स्वप्नील हिंगोली येथील खटकाळी बायपास भागात रेल्वे रुळावर बसून दोन मित्र आपल्या मोबाईलवर पब्जी गेम खेळत होते.
सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रेल्वे आल्याने गेममध्ये मग्न असलेले दोन्ही मित्र रेल्वेखाली येऊन जागीच मृत झाले. दोन्ही मित्रांना गेम खेळत असताना आपला जीव गमावला लागला. घटनास्थळी बघ्याची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. अंधार असल्याने नागरिकांनी मोबाईल बॅटरीच्या साहाय्याने मृतदेह ओळखले. हे दोघेही हनुमान नगर येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
या दोन्ही मित्रांनी सायंकाळी 6.45 च्या सुमारास रेल्वे रुळाजवळ आपली मोटारसायकल उभी करून रेल्वे रुळावरच मोबाईल वर पब्जी गेम खेळत बसले. याचवेळी अचानक अजमेर-हैदराबाद ही रेल्वे आल्याने या दोघांना धडक लागल्याने दोघेजण रेल्वेखाली चिरडले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
काही वेळामध्ये या रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्याने घटनास्थळी मोठी गर्दी जमली. त्यातील काही जणांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान याचवेळी दुसरी रेल्वे आली असता स्थानीय नगरसेवक राम कदम यांनी रेल्वे थांबविली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक कांबळे आल्यानंतर युवकांनी रेल्वे रुळावरील दोन्ही युवकाचे मृतदेह बाजूला काढल्यानंतर उभी केलेली रेल्वे निघून गेली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement