एक्स्प्लोर
Advertisement
एसटी चालकाला भररस्त्यात खाली ओढून कुऱ्हाडीने मारहाण
पाथर्डी-अहमदनगर बसचे चालक रोहिदास पालवे यांना बेदम मारहाण करण्यात आली. एसटीचा पाठलाग करुन आणि बस अडवून चालकाला खाली ओढलं. खाली ओढून रोहिदास पालवे यांना काठ्या आणि कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आली.
अहमदनगर : वाहनाला साईड देण्यावरुन झालेला वाद मनात धरत एसटी चालक आणि महिला वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीत घडली आहे. पाथर्डी-अहमदनगर बसचे चालक रोहिदास पालवे यांना बेदम मारहाण करण्यात आली.
एसटीचा पाठलाग करुन आणि बस अडवून चालकाला खाली ओढलं. खाली ओढून रोहिदास पालवे यांना काठ्या आणि कुऱ्हाडीने बेदम मारहाण करण्यात आली. रक्तबंबाळ झालेल्या रोहिदास पालवे यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रोहिदास पालवे यांच्यासोबतच महिला वाहकाला मारहाण करत जमावाने सहा हजार आठशे रुपये हिसकावून घेतले. राजेंद्र आठरेसह दहा जणांनी हा हल्ला केला आणि चालक-वाहकाला मारहाण केली.
या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी राजेंद्र आठरे आणि पालवे यांच्यात एकमेकांच्या वाहनांना साईड देण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर रविवारी जमावाने जोहारवाडी परिसरात बसला अडवून ही मारहाण केली.
पोलिसांनी याप्रकरणी राजेंद्र आठरेसह दोन जणांना अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement