एक्स्प्लोर
कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर कोर्टाच्या आवारातच हल्ला
अहमदनगर : कोपर्डी प्रकरणातील आरोपींवर अहमदनगरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कोर्टाच्या परिसरातच हा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरमध्ये कोपर्डी प्रकरणाच्या सुनावणीवेळी आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला. शिवबा संघटनेनं हा हल्ला केला आहे. शिवबा संघटनेच्या राजेंद्र पाटील, बाबूराव वाळेकर, अमोल खुणे आणि गणेश खुने यांनी हा हल्ल्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याच्या प्रयत्नात असलेले चारही जण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडले गेले आहेत. शिवबा संघटनेच्या चारही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement