एक्स्प्लोर
Raj Thackerey : विधानसभेत मनसेला दोन आकडी आमदार मिळणार, राज ठाकरेंबद्दल ज्योतिषांचं भाकित
2019 हे वर्ष राज ठाकरेंसाठी अनुकूल असल्याचं मराटकर शास्त्रींनी वर्तवलं आहे.
नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेचे दोन आकडी आमदार दिसणार असल्याचं भाकित ज्योतिष महर्षी सिद्धेश्वर मारटकर यांनी केलं आहे. राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत हातमिळवणी करुन विधानसभेत ते निवडणूक लढवतील असंही त्यांनी भाकित केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात राज ठाकरेंच्या पत्रिकेत गुरु पुन्हा धनु राशीत असेल. याचाच परिणाम म्हणजे राज ठाकरेंना त्याचा फायदा होणार. तसंच राष्ट्रवादीसारख्या पक्षासोबत हातमिळवणी करुन विधानसभेत ते निवडणूक लढवतील. राष्ट्रवादी सोबतच शिवसेनेची त्यांना मतं मिळणार असं भाकित करण्यात आलं आहे.
मागील काही दिवसात शनीचे भ्रमण रवी समोरुन होत असल्याने 2014 ते 19 या काळात त्यांना विशेष यश मिळू शकले नाही, पण पुढे रवी समोरुन गुरु जाणार असल्याने याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. मनसेचे दोन आकडी आमदार दिसणार, प्रत्यक्ष किती आणि कोण होणार हे आत्ता सांगू शकणार नाही पण पुढे निवडणुका जाहीर होताच ते ही बघू असं म्हणत 2019 हे वर्ष राज ठाकरेंसाठी अनुकूल असल्याचं मारटकर शास्त्रींनी वर्तवलं आहे.
"नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील, परंतु त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही", असे भाकित महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी व्यक्त केले आहे. काल रविवारी नाशिकमध्ये ज्योतिषांची परिषद सुरु आहे. या परिषदेमध्ये ज्योतिषांकडून विविध भाकितं व्यक्त करण्यात आली आहेत.
मारटकर यांनी सांगितले की, "बहुमत मिळणार नसलं तरी मोदीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्वात जास्त खासदार निवडून येतील. महाराष्ट्राबात मारटकर म्हणाले की, राज्यात शिवसेना-भाजप युतीच्या जागा कमी होणार आहेत."
मारटकर म्हणाले की, "मोदींची रास वृश्चिक आहे. सध्या गुरुचं भ्रमण त्यांच्या राशीतून सुरु आहे आणि हेच त्यांना सत्ता मिळवण्यासाठी पूरक ठरणार आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement