एक्स्प्लोर

सिंधुदुर्ग बँक निवडणूक : शेलार-सावंत यांच्यात रंगला मालवणी भाषेत कलगीतुरा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. या निवडणुकीवरुन भाजपचे आमदार आशिष शेलार आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यात मालवणी भाषेतच कलगीतुरा रंगला आहे.

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून , भाजपने 19 पैकी 11 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. यानंतर राजकीय नेत्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगल्याचं चित्र पाहायला मिळतय. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यात तर मालवणी भाषेतच कलगीतुरा रंगला आहे. नेमकं काय म्हणालते दोन्ही नेते ते पाहुयात...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांचे वर्चस्व पणाला लागले होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. अखेर यामध्ये  भाजपनं आपला झेंडा रोवला आहे. या भाजपच्या विजयाबद्दल बोलताना शेलार यांनी मालवणी भाषेत ट्वीट केले आहे. 

देवानं साथ सोडल्याने आणि विधानपरिषदेची एक जागा गमावल्यानंतर सिंधुदुर्गात महाविकास आघाडीचा भोपळा फुटला आहे, अशा शब्दात शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा लगावला आहे. तसेच नवी मुंबई, ठाणे, मुंबई महापालिका निवडणुकींच्या निकालाची ही नांदी आहे. अमितभाई शाह म्हणाले त्याप्रमाणे हिम्मत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत! असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

तर आशिष शेलार यांच्या या ट्वीटवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सावंत यांनीदेखील मालवणी भाषेत ट्वीट करत शेलार यांच्यावर चांगलाच निशाणा लगावला आहे.

शेलार अर्ध्या हळकुंडाने किती पिवळे होणार? एक जिल्हा बँक निवडणूक जिंकलास म्हणून आम्हाला काही फरक पडत नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. तुम्ही कितीहा हातपाय आपटले तरी पुढचे 25 वर्ष राज्याच्या सत्तेत महाविकास आघाडीच असेल. तुम्ही वाट बघा. तुमच्या भ्रमाचा भोपळा तुमच्याच डोक्यावर फुटेल असे ट्वीट करत सावंत यांनी शेलार यांच्यावर निशाणा साधला आहे.

तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.  सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अपेक्षेनुसार सुरुवात भाजपाच्या विजयाने झाली आहे. 19 पैकी 11 जागांवर आमचं वर्चस्व कायम राहिलंय. सत्तेच्या जोरावर सुरू असलेलं राजकारण, केंद्रीय मंत्री नारायण राणेजी आणि आमदार नितेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने चाललेल्या कारवायांना ही सणसणीत चपराक असल्याचे पाटील म्हणालेत.

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वात भाजपनं बाजी मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आली असून 11 जागा जिंकत भाजपनं सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला आठ जागांवर विजय मिळवता आला आहे. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या या निवडणुकीमध्ये विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे विजय साजरा करण्यासाठी कोकणात जाणार असल्याची देखील माहिती आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपनं झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचं वर्चस्व पणाला लागलं होतं. परंतु, अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला  आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक गाजली होती. त्यातच या निवडणूक प्रचारादरम्यान शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले होते. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. अशातच आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये भाजपचं वर्चस्व मिळवलं आहे.

महत्ताच्या बातम्या:

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget