![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi wari 2023 : रोटी घाटात जमला वैष्णवांचा मेळा; तुकोबांची पालखी उंडवजी गवळ्याची येथे मुक्कामी तर ज्ञानोबां घेणार वाल्ह्यात विसावा
संत तुकाराम महाराजांची पालखी आज बारामती तालुक्यात प्रवेश केला. दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम आटपून बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे
![Ashadhi wari 2023 : रोटी घाटात जमला वैष्णवांचा मेळा; तुकोबांची पालखी उंडवजी गवळ्याची येथे मुक्कामी तर ज्ञानोबां घेणार वाल्ह्यात विसावा ashadhi wari 2023 sant dnyaneshwar maharaj stay in valhe and tukaram maharaj palkhi in undavadi gavalyachi baramati Ashadhi wari 2023 : रोटी घाटात जमला वैष्णवांचा मेळा; तुकोबांची पालखी उंडवजी गवळ्याची येथे मुक्कामी तर ज्ञानोबां घेणार वाल्ह्यात विसावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/17/0140758cf8a99eadfb2ac4e03d22a74b1687003506753442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ashadhi wari 2023 : संत तुकाराम महाराजांची पालखी आज (Ashadhi wari 2023 ) बारामती तालुक्यात प्रवेश केला. दौंड तालुक्यातील वरवंड येथील मुक्काम आटपून बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची या गावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. परंतु हे मार्गक्रमण करीत असताना दौंड तालुक्यातील रोटी घाट हा वारकऱ्यांचा कस पाहणार असतो. पालखीचा रथ ओढण्यासाठी रोटी घाटात आठ बैल जोड्या लावण्यात आल्या होत्या.
या घाटात सर्वदूर वारकऱ्यांचा मेळा दिसत होता. संत ज्ञानेश्वर महराजांच्या पालखीसाठी जसा दिवे घाट कठिण टप्पा असतो. त्याच प्रमाणे रोटी घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी कठिण टप्पा असतो. हाच कठिण टप्पा वारकऱ्यांनी हसत खेळत आणि फुगड्या घालत पार केला आहे. हा घाट निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. यावेळी निसर्ग तुकाराम महाराजांची वाट बघत असल्याचं चित्र दिसत होतं.
पालखी मार्ग झाला सोपा...
संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचं काम काही ठिकाणी सुरु आहे. या घाटावर असलेले उंच किंवा खोल तीव्र उतार यांच्यावर काम करण्यात आलं आहे. या पालखी मार्गाचं कामांची वेळोवेळी नितिन गडकरींकडून करण्यात येते. लवकरच या पालखी मार्गाचं काम पूर्ण करु, असं त्यांनी सांगितलं आहे. याच मार्गाचं काही प्रमाणात काम पूर्ण झालं असल्याने यंदा वारकऱ्यांना रोटी घाट चढताना फार कस लागला नाही.
ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे गावात
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता जेजुरीहून वाल्हे नगरीकडे मार्गस्थ झाला. या प्रवासादरम्यान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे देखील या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. तावडे हे जेजुरी ते वाल्हे यादरम्यान या वारी सोहळ्यामध्ये पायी चालत असतात. या वर्षी सुद्धा जेजुरीपासून ते या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत. यादरम्यान टाळ वाजवत भजन म्हणत ज्ञानोबा माऊलीच्या गजरात ते तल्लीन झाले. टाळ मृदुंगाच्या तालावर त्यांनी ठेकाही धरला. आजचा ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे गावात असणार आहे.
वारकरी एक्स्प्रेस...
या वारी दरम्यान वारकरी रस्त्याने तर प्रवास करतातच मात्र रेल्वे लाईनच्या बाजूनेही प्रवास करत असतात. याच प्रवासाचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत वारकरी भरधाव एक्स्प्रेसच्या बाजूने चालताना दिसत आहेत. या फोटोत वारकऱ्यांची एक्स्प्रेसही बघायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)