एक्स्प्लोर

वारकऱ्यांविना आषाढीचा सोहळा...! मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक महापूजा, विठ्ठल बडेंना पूजेचा मान

दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीची पूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला.

पंढरपूर : दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या पाथर्डी येथील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बडे यांना मान मिळाला. आषाढ शुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यास शोभेच्या जांभळ्या , पांढऱ्या व गुलाबी रंगाच्या फुलांनी सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे. विठुराया,आषाढीपासून कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ: मुख्यमंत्री यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. हा मान मला मिळेल असं स्वप्नातही वाटत नव्हतं. अशी पूजा करावी लागेल, असंही कधी वाटलं नव्हतं. मी माऊलीला साकडं घातलं आहे. आता आम्हाला चमत्कार दाखव, मानवानं हात टेकलेत. आपल्याकडे काही औषध नाही. असं तोंडाला पट्टी घालून कुठवर जगायचं. संपूर्ण आयुष्य अडकून गेलं आहे. आजपासून, या आषाढीपासून आम्हाला या कोरोनाच्या संकटातून बाहेर काढ. संपूर्ण जगाला पुन्हा आनंदी, मोकळं जीवन जगायला मिळू दे, असं साकडं घातलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. वारकऱ्यांविना आषाढीचा सोहळा...! मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक महापूजा, विठ्ठल बडेंना पूजेचा मान
सावळं सुंदर विठुरायाचं रुप.. भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आषाढी यात्रेनिमित्त भाविकांना पंढरपुरात येण्यास बंदी आहे. यामुळे यंदा विठ्ठलाची दर्शन रांग रिकामी आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपासून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात 30 जूनपासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारकऱ्यांविना आषाढीचा सोहळा...! मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक महापूजा, विठ्ठल बडेंना पूजेचा मान पालख्या एसटी बसने पंढरीला आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या एसटी बसने पंढरीला पोहोचल्या. इतिहासात पहिल्यांदाच तुकाराम महाराजांच्या पादुका या एसटीतून पंढरीला आल्या. तत्पूर्वी पंचपदी अर्थात पाच भजन झाले अन् पादुका मंदिराच्या मुख्य सभा मंडपातून बाहेर पडल्या. मग मंदिराला प्रदक्षिणा घालून पादुका विठाई बसच्या पहिल्या बाकावर विराजमान झाल्या. पारंपारिक मार्गावरूनच ही एसटी पंढरीकडे मार्गस्थ झाली. या दरम्यान इनामदार वाडा, अनगडशाह बाबा दर्गा, चिंचोलीचं शनी मंदिर इथं आरती झाली. तर पुढे रोटी घाटात अभंग आरती पार पडली. मग मानाच्या क्रमातून सर्व बस रात्री पंढरीत आल्या. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका पंढरपूरमध्ये दाखल झाल्या. पैठणचे संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर या पालख्या एसटी बसमधून पंढरीत दाखल झाल्या. संतांच्या पादुका द्वादशी ऐवजी शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार पौर्णिमेला पाठवा कोरोनामुळे यंदा यात्राच भरली नसली तरी परंपरा न मोडण्यासाठी राज्य सरकारने मानाच्या पादुकांना एसटी बस मधून पंढरपुरात फक्त 20 भाविकांसह आणले खरे मात्र आता पादुका परत जाण्याबाबत वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला असून शेकडो वर्षाच्या परंपरेनुसार पौर्णिमेचा काला करून परत फिरायची मागणी केल्याने पेच निर्माण होणार आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपला निरोप आजच रात्री पोहोचवू असे आश्वासन सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या पालखी सोहळ्यासोबतच्या मानकऱ्यांना दिले आहे. आज दशमीला या पादुका रात्री पोहोचल्यावर माऊली पालखी सोहळ्यातील अॅड. ढगे यांनी पादुका द्वादशीलाच परत नेण्याच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. शासनाने या पादुकांना एकादशी दिवशी चंद्रभागा स्नान आणि सोबत आलेल्या वारकऱ्यांना नगर प्रदक्षिणेला परवानगी दिली आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला मंदिरात संत भेट घेऊन परत माघारी घेऊन जाण्याचे नियोजन केले आहे. यामुळे वारकरी संप्रदाय नाराज असून यंदा समन्वयाची वारी आम्ही करीत आलोय मात्र आजवरच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात कधीही पादुका द्वादशीला परत गेलेल्या नाहीत. आम्हाला आजीनं वारकरी कमी करण्यास सांगितले तरी आम्ही त्याला तयार आहोत. मात्र शासनाने त्यांच्याच वाहनातून पादुकांना द्वादशी ऐवजी पौर्णिमेला काला करून परत जाण्याची परंपरा राखावी अशी विनंती केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget