एक्स्प्लोर

ASER Report 2022: विद्यार्थीसंख्या वाढली पण गुणवत्ता ढासळली, सर्वेक्षणातून दावा

Coronavirus: कोरोना काळात विद्यार्थ्यांची शाळेत प्रवेश घेण्याची संख्या वाढली आहे. पण याच काळात विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळल्याचे 'असर'च्या सर्वेक्षणातून समोर आले.

ASER Report 2022:  कोरोना महामारीमुळे देशातील सरकारी आणि खासगी शाळेतील 5 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळल्याचं 'असर'च्या सर्वेक्षणातून समोर आलेय. विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लिखाणावर परिणाम झाला असून अनेकजणांना बेरीज-वजाबाकीही येत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोरोना महामारीनंतर 'असर' या संस्थेनं (ASER Annual State of Education Report) केलेल्या सर्व्हेमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांमध्ये देशभरातील अनेक शाळा बंद होत्या.. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरु झालं. पण हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना रुचलं नसल्याचं समोर आले आहे. देशभरातील पाच ते 16 वयोगटातील मुलांना वाचता आणि लिहिता न येण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. सरकारी शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचेही या सर्व्हेतून समोर आले आहे.

प्रथम फाऊंडेशनच्या नेतृत्वाखालील ASER 2022 अहवालात देशभरातील पाच ते 16 वयोगटातील मुलांचं सर्वेक्षण घेण्यात आलं. सरकारी आणि खासगी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत या अहवालातून माहिती समोर आली आहे. कोरोना काळात मोठ्या कालावधीत शाळा बंद होत्या, मात्र मुलांच्या नोंदणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 6-14 वयोगटातील मुलांची शाळेतील नोंदणी 98.4  टक्के इतकी झाली आहे. 2018 मध्ये ही संख्या 97.2 टक्के इतकी होती. त्याशिवाय देशभरात शाळाबाह्य मुलींच्या संख्येत मोठी घट झाल्याचं अहवालातून दिसून आलेय. 2022 मध्ये प्री प्रायमरी वयोगटातील मुलांच्या संख्येत 7.1 टक्केंनी वाढ झाली आहे. 
 
असर या संस्थेनं (ASER Annual State of Education Report) चार वर्षानंतर अहवाल तयार केला आहे. 19 हजार गाव-खेडे आणि 616 जिल्ह्यात त्यांनी असर संस्थेनं सर्व्हे केला आहे. तीन लाख 74 हजार 544 घरांमधून आणि सात लाख मुलांशी (3-16 वय) सर्व्हेसाठी संपर्क करण्यात आला. 

Private Tuition खासगी शिकवणीकडे कल वाढला -

ASER Report च्या रिपोर्ट्सनुसार, ग्रामीण भागातील दोन टक्के  विद्यार्थ्यांनी शाळेत नोंदणी केलेली नाही. 2018 ते 2022 या कालावधीत शाळा बंद होत्या, तरीही विद्यार्थ्यांचा शाळेतील कल वाढला आहे. ग्रामी भारतामध्ये खासगी शिकवणीकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसून आलेय. 

ASER Survey Report राज्यानुसार आकडेवारी - 
देशातील सर्व राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लिखानावर परिणाम झाला असला तरी संख्या मात्र वाढली आहे. केरळसारख्या राज्यात विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर मिझोराम आणि जम्मू काश्मीर या राज्यात विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे.

2018 आणि 2022 मधील असरचा रिपोर्ट पाहा..

राज्य साल 2018 सर्वे साल 2022 सर्वे
आंध्र प्रदेश 63.2 70.8
अरुणाचल प्रदेश 60.1 62.2
आसाम 71.7 71.9
बिहार 78.1 82.2
छत्तीसगढ 76.4 81.6
गुजरात 85.6 90.9
हरियाणा 42.6 51.9
हिमाचल प्रदेश 58.9 66.3
जम्मू आणि कश्मीर 58.3 55.5
झारखंड 78.0 83.3
कर्नाटक 69.9 76.3
केरळ 48.0 64.5
मध्य प्रदेश 69.6 70.0
महाराष्ट्र 61.6 67.4
मणिपूर 28.0 32.8
मेघालय 35.7 43.7
मिझोराम 72.4 64.7
नागालँड 49.3 50.8
ओदिशा 88.0 92.1
पंजाब 46.7 58.8
राजस्थान 60.0 68.5
सिक्किम 68.6 75.2
तमिळनाडू 67.4 75.7
तेलंगाणा 57.4 70.1
त्रिपुरा 85.2 86.1
उत्तर प्रदेश 44.3 59.6
उत्तराखंड 55.0 61.5
पश्चिम बंगाल 88.1 92.2

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलंRaj Thackeray Full Speech Ghatkopar : अपयशी ठरलो तर दुकान बंद करेन! राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन...ABP Majha Marathi News Headlines 9 PM TOP Headlines 9 PM 07 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget