एक्स्प्लोर

Asaram Bapu: आसाराम बापूवर 7 दिवस माधवबाग आयुर्वेदिक केंद्रात उपचार, पोलिसांनी खोपोलीत सुरक्षा वाढवली

Asaram Bapu: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे.

खोपोली: जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात हृदयविकाराच्या उपचारासाठी आणण्यात आले आहे. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu) हृदयाशी संबंधित आजारावर उपचारासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील माधवबाग वैद्यकीय केंद्रात आणण्यात आले आहे.

83 वर्षीय आसारामला (Asaram Bapu) सप्टेंबर 2013 मध्ये अटक करण्यात आली होती. मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास खोपोलीतील माधवबाग आयुर्वेदिक येथे आणण्यात आले, तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आसाराम पुढील सात दिवस उपचारासाठी या वैद्यकीय सुविधेत राहणार आहेत. 13 ऑगस्ट रोजी राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत असताना महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. रायगड पोलिसांनी तेथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. 

राजस्थान उच्च न्यायालयाने आयुर्वेदिक उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला (Asaram Bapu) ह्रदयविकाराचा त्रास होत होता. आसाराम बापूला (Asaram Bapu) येथील रुग्णालयामध्ये ठेवण्यात आल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती  पुणे पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याला कोर्टाने त्याला खोपोलीत उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. 

पॅरोल मंजूर करताना हायकोर्टाने काही अटी घातल्या होत्या, ज्यात त्याच्यासोबत चार पोलीस कर्मचारी प्रवास करतील, त्याला सोबत दोन अटेंडंट ठेवण्याची मुभाही देण्यात आली होती. त्याला खोपोलीतील एका खाजगी कॉटेजमध्ये ठेवण्यात येणार असून उपचार व वाहतुकीचा संपूर्ण खर्च तसेच पोलीस बंदोबस्ताचा खर्च त्याला करावा लागणार आहे. आरोग्याच्या कारणास्तव शिक्षेला स्थगिती देण्याची आसारामची (Asaram Bapu) याचिका उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळली होती.

रुग्णालयात पोहोचताच पॅरोलचा कालावधीची मोजणी सुरू 

पॅरोलचा कालावधी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यापासून मोजला जाईल, जोधपूर पोलिसांनी त्याला मंगळवारी कारागृहातून विमानतळावर नेण्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली आहे. डीसीपी आलोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, आसारामच्या (Asaram Bapu) म्हणण्यानुसार, जोधपूर पोलिसांचे उपनिरीक्षक भंवर सिंह यांच्या नेतृत्वाखाली 4 पोलिस त्याच्यासोबत असतील. आसारामच्या वतीने पॅरोलसाठी अनेकवेळा याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र प्रथमच 13 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी आणि न्यायमूर्ती मुन्नारी लक्ष्मण यांच्या खंडपीठाने जोधपूर एम्सच्या वैद्यकीय अहवालाच्या आधारे सात दिवसांचा पॅरोल दिला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP MajhaPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
Embed widget