एक्स्प्लोर
खडसेंची कामगिरी समाधानकारक, भाजपच्या गुप्त सर्व्हेतून माहिती
दिल्लीतील ‘चाणक्य’ संस्थेच्या माध्यमातून भाजपने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील भाजपच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आले.
मुंबई : आमदार म्हणून माझी कामगिरी समाधानकारक असल्याचे सर्व्हेतून समोर आलंय, असा दावा माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय. तसेच, जनतेला दिलेली आश्वासनं पाळल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय.
दिल्लीतील ‘चाणक्य’ संस्थेच्या माध्यमातून भाजपने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील भाजपच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आले.
खडसेंच्या कामगिरीबाबत जनता समाधानकारक
‘चाणक्य’च्या सर्व्हेतून जनतेला प्रश्न विचारण्यात आला की, “एकनाथ खडसे यांना पुन्हा आमदार बनवू इच्छित आहात का?” या प्रश्नाला 51 टक्के लोकांनी ‘होय’ असे उत्तर दिले, 41 टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले, तर 8 टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याबाबत जनतेच्या मनात सकारात्मक मत असल्याचे दिसून येत आहे.
माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.
भाजपकडून गुप्त सर्व्हे
दुष्काळ, महागाई, इंधन दरवाढ आणि एकंदरीत सरकारी धोरणांमुळे टीकेचं धनी बनलेलं केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारकडून जनमताची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील भाजप सरकारने गुपचूप सर्व्हे करुन घेतल्याचं समोर आलं आहे. दिल्लीतील ‘चाणक्य’ या संस्थेकडून केलेल्या सर्वेत, भाजपचे राज्यातील 6 खासदार आणि जवळपास 50 आमदार धोक्यात असल्याचं समोर आलं आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’ या दैनिकाने याबाबतचं वृत्त छापलं आहे.
महाराष्ट्रात केलेल्या या सर्वेनुसार भाजपच्या 121 आमदारांपैकी 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे.
नुकत्याच झालेल्या या सर्वेत, मतदारांना त्यांच्या मतदारसंघातील आमदार-खासदारांना रेटिंग/गुण देण्यास सांगितलं होतं. आमदार-खासदाराची कामगिरी समाधानकारक आहे की नाही?, आमदार-खासदारपदाचा उमेदवार बदलावा की कायम ठेवावा? असे प्रश्न या सर्वेत विचारण्यात आले होते.
40 टक्के आमदारांची कामगिरी निराशाजनक
भाजपच्या एका आमदाराने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वेत 40 टक्के आमदारांची चार वर्षातील कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. जर उर्वरीत कार्यकाळात कामगिरी सुधारली नाही तर 2019 मध्ये त्यांच्या जागी दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली जाईल, असा इशारा देण्यात आल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
जवळपास 60 टक्के मतदारांनी विद्यमान आमदार-खासदारांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे.
दुसरीकडे ज्या खासदारांना केवळ 19 टक्क्यांपर्यंत पसंती मिळाली आहे, त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. सध्याच्या भाजपच्या 21 खासदारांपैकी 6 खासदांचं तिकीट 2019 मध्ये कापण्याची चिन्हं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement