एक्स्प्लोर
Accident News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बस आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात;एकाच जागीच मृत्यू, तर अनेक जण जखमी
Accident News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बस आणि आयसर टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एकाच जागीच मृत्यू झाला असून इतर अनेक जण जखमी झाले आहेत.
Mumbai Ahmedabad National Highway Accident News
1/6

Accident News: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका खाजगी बस आणि आयसर टेम्पोमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
2/6

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर तलासरीच्या धुंदलवाडी येथे ही अपघाताची घटना घडली आहे.
3/6

या भीषण अपघातात खाजगी बस मधील वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर रियाज असं मृत वाहकाचं नाव समोर आले आहे.
4/6

या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे मोठं नुकसान झालं असून या अपघातामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. तर सात ते आठ किलोमीटरच्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही बघायला मिळाले आहे.
5/6

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
6/6

सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Published at : 01 Jun 2025 08:07 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
विश्व
क्रिकेट




















