BJP On Penguin : राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत हवी, भाजपचा आग्रह
BJP On Penguin : राणीच्या बागेत जन्मलेल्या पेंग्विनच्या पिल्लांची नावं मराठीत हवी, भाजपचा आग्रह
भाजपकडून राणीच्या बागेतील पेंग्विनच्या नावांसंदर्भात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. नव्याने जन्मलेल्या पेंग्विनच्या नवजात पिल्ल्यांचे नाव मराठीमध्ये हवं असल्याचा आग्रह भाजपकडून धरण्यात आला आहे. दरम्यान, राणीच्या बागेच्या प्रशासनाकडून कोणताही निर्णय यासंदर्भात न घेण्यात आल्याने आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनाला सुरुवात…
नितीन बनकर, अध्यक्ष, भाजप भायखळा विधानसभा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला
मात्र नेहमीच मराठीचा अवमान राणीचे बाग प्रशासन करत राहिली आहे
बाहेरुन जरी पिल्लं आणली असली तरी त्यांचा जन्म मराठी मातीत झाला आहे
राणीबाग प्रशासनाने गळचेपी केलेली आहे
आम्ही जाब विचारणार आहोत
मराठी द्वेष मोठा आहे यांच्यात, मराठी नावं द्यावी ऐवढंच आम्हाला म्हणायचं आहे
कोणाला दुखवण्याचा आमचा हेतू नाही आहे
पण मराठीवर अन्याय होणार नाही हे देखील राणी बाग प्रशासनानं बघावं





















