एक्स्प्लोर
फुंडकरांच्या रिक्त जागेसाठी अरुण अडसडांचा अर्ज दाखल
अडसड दोन वेळा विधानसभेचे आमदार होते. तसेच केंद्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष होते. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या जागेवर ग्रामीण आणि ओबीसी चेहरा भाजपने दिला आहे.

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी भाजपकडून माजी आमदार आणि अमरावतीचे भाजप नेते अरुण अडसड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण अडसड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट आणि भाजपचे अन्य आमदार उपस्थित होते.
अडसड दोन वेळा विधानसभेचे आमदार होते. तसेच केंद्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष होते. दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या जागेवर ग्रामीण आणि ओबीसी चेहरा भाजपने दिला आहे.
विधानपरिषद पोटनिवडणूक बिनविरोध
दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आज दुपारी 3 वाजता संपली. मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण अडसड यांच्याव्यतिरिक्त इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. त्यामुळे उद्या या अर्जाची छाननी करुन उमेदवार पात्र ठरल्यास 27 सप्टेंबरला अरुण अडसड यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात येईल.
"आम्हाला खात्री आहे,ही विधानपरीषदेची निवडणूक बिनविरोध होईल. अनेक चळवळीमध्ये अरुण अडसड यांचं काम आहे. ते पक्ष स्थापनेपासून कार्येकर्ते आहेत. सूतगिरणी घोटाळ्यासंदर्भात जे आरोप झाले ते राजकीय हेतूने झाले. त्यात काही तथ्य नाही. पक्ष हा सर्व तपासणी करूनचं उमेदवार देत असतो", अशी प्रतिक्रिया यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली.
संबंधित बातमी
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement
Advertisement
























