एक्स्प्लोर
राज्यातील विविध मंडळांच्या नियुक्त्या जाहीर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष आणि दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती.
![राज्यातील विविध मंडळांच्या नियुक्त्या जाहीर Appointments of different Corporations has been announced राज्यातील विविध मंडळांच्या नियुक्त्या जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/29141516/Cm-meeting-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य शासनाने विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख संचेती यांची, तर ऊर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती केली आहे.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळाचे अध्यक्ष आणि दोन महामंडळाच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची, तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजय काका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असलेल्या डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)