एक्स्प्लोर
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाख 51 हजार 748 अर्ज कृषी आयुक्तालयाकडे आले असून, यातील सर्वाधिक अर्ज हे बीड जिल्ह्यातून आले आहेत.
![पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज Application On Pradhanmantri Crop Insurance Scheme Latest Updates पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/01/08192156/Crop_Insurance.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फाईल फोटो
मुंबई : पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाख 51 हजार 748 अर्ज कृषी आयुक्तालयाकडे आले असून, यातील सर्वाधिक अर्ज हे बीड जिल्ह्यातून आले आहेत.
राज्याच्या कृषी आयुक्तलयाने जून महिन्यापासून 2017 साठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ राबवण्यास सुरुवात केली. 2017 च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलै 2017 पर्यंत या योजनेत सहभागी व्हावं, असं आवाहनही कृषी आयुक्तलायकडून करण्यात आले होतं.
त्यानुसार कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त आकडेवारीनुसार, राज्यातील अहमदनगर सोडता इतर सर्व जिल्ह्यातून 67 लाख 51 हजार 748 अर्ज प्राप्त झाले आहेत. यातील सर्वाधिक अर्ज हे बीड जिल्ह्यातून प्राप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातून जवळपास 11 लाख 68 हजार 359 अर्ज प्राप्त झाले आहेत. तर त्या खालोखाल नांदेड जिल्ह्यातील 9 लाख 64 हजार 302 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. तर सर्वात कमी कोल्हापूर जिल्ह्यातून अर्ज प्राप्त झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील केवळ 416 शेतकऱ्यांनीच पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत.
प्रादेशिक आकडेवारीनुसार, एकट्या मराठवाड्यातील 83 टक्के म्हणजे, 56 लाख 4 हजार 22 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केले आहेत.
![पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/13115149/PIK-VIMA-21.jpg)
दरम्यान, पीकनिहाय विमा अर्जाची संख्या बदलू शकते, असंही सांगण्यात येत आहे. सध्या पीकविम्यासाठी जे अर्ज प्राप्त झाले आहेत, त्यांची छाननी पूर्ण झाल्यानंतर पीक विम्याचं वाटप केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या
सविस्तर माहिती : पंतप्रधान पीक विमा योजना
पीक विम्यासाठी दाखल अर्ज
![पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/13115147/PIK-VIMA-11.jpg)
![पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/13115149/PIK-VIMA-21.jpg)
![पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी राज्यभरातून 67 लाखापेक्षा जास्त अर्ज](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/13115151/PIK-VIMA-31.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)