एक्स्प्लोर

पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती, अण्णा हजारेंची सीबीआय कोर्टात साक्ष

तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी आपण पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र हे पुरस्कार परत केले मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणून मी शेवटचा उपाय म्हणून आपण उपोषणाला बसलो.

मुंबई :पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय कोर्टात मंगळवारी हजर झाले होते. "पद्मसिंह पाटील यांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. याची मी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील हे तात्कालीन मुख्यमंत्री शदर पवारांचे नातेवाईक आहेत." असा खळबळजनक आरोप अण्णांनी आपल्या जबानीत केला. या सुनावणीत इतर आरोपींसह सध्या जामिनावर असलेले मुख्य आरोपी पद्मसिंह पाटीलदेखील उपस्थित होते.
तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी आपण पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र हे पुरस्कार परत केले मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. म्हणून मी शेवटचा उपाय म्हणून आपण उपोषणाला बसलो. त्यानंतर सरकारनं पी.बी. सावंत आयोगाकडे या भ्रष्टाचाराची चौकशी सोपवली.
या चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी ठरल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र याचा राग मनात धरून, पद्मसिंह पाटलांनी मला जिवे मारण्याची धमकी देत माझी सुपारी दिली होती. तसेच ही तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबाव टाकला जाऊ लागला. एकदा माझ्या ऑफिसमध्ये येऊन पद्मसिंह पाटलांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्यांकडे एक कोरा चेक सोपवला, आणि सांगितलं हवी ती किंमत टाका, मी याचीही रितसर तक्रार दाखल केली. असं अण्णांनी आपल्या जबानीत कोर्टाला सांगितलं.
ही माहिती आपल्याला कोणी दिली, याविषयी अण्णा हजारेंना विचारणा केली असता त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितल्याची माहिती कोर्टाला दिली. मात्र कार्यकर्त्याचं नाव विचारलं असता अण्णा हजारेंना उत्तर देता आलं नाही.
मात्र अण्णांच्या या जबानीवर बचावपक्षानं तीव्र आक्षेप घेत, या सर्व गोष्टींचा या केसशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. बचावपक्षानं केलेल्या उलटतपासणीत अण्णांनी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाची आपल्याला काहीही माहिती नाही. जी माहिती समजली ती केवळ वृत्तपत्र आणि मीडियातूनसमोर आलेल्या बातम्यांवर आधारीत होती, असं त्यांनी कोर्टाला सांगितलं.
राजकीय वैमनस्यातून काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांची 2006 साली नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सात जणांना अटक केली होती. मात्र पद्मसिंह पाटील हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. या हत्येमागे नेमके प्रमुख कारण काय असू शकते याचा उलगडा अण्णा हजारे करू शकतात असा दावा सीबीआयनं केला होता. कारण या प्रकरणाशी संबंधित काही जाहीर विधानं अण्णा हजारे यांनी माध्यमांत केली होती.
मात्र बचावपक्षानं घेतलेल्या आक्षेपांमुळे अण्णांना साक्षीसाठी बोलावण्याची परवानगी सत्र न्यायालयानं नाकारली होती. त्यानंतर पवनराजेंच्या पत्नी आनंदीदेवी यांनी ही परवानगी मिळावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ही याचिकादेखील कोर्टानं फेटाळून लावली. हायकोर्टाच्या या निर्णयाला आनंदीदेवी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाचा निर्णय रद्द करत अण्णांना साक्षीसाठी बोलावण्याची परवानगी दिली होती.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget