एक्स्प्लोर
जनलोकपाल आंदोलनासाठी अण्णांची दिल्लीकडे कूच
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अण्णांनी यादवबाबांचं दर्शन घेतलं आणि श्रद्धास्थानांचं दर्शन घेऊन नतमस्तक झाले. यावेळी गावातील महिलांनी अण्णांचं औक्षण केले.
राळेगण (अहमदनगर) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनलोकपाल आंदोलनासाठी दिल्लीकडे कूच केली आहे. सकाळी सव्वा दहा वाजता अण्णा दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी राळेगणकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अण्णांना निरोप देण्यासाठी परिसरातील महिला, पुरुष आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
दिल्लीला रवाना होण्यापूर्वी अण्णांनी यादवबाबांचं दर्शन घेतलं आणि श्रद्धास्थानांसमोर नतमस्तक झाले. यावेळी गावातील महिलांनी अण्णांचं औक्षण केले.
राळेगणमधील नागरिकांनी तिरंगा घेत, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ आणि ‘अण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ असा जयघोष केला.
यावेळी बोलताना अण्णांनी आंदोलनासाठी माझ्या गावातील श्रद्धास्थानांचं दर्शन घेऊन मी दिल्लीच्या आंदोलनाला निघाल्याचं सांगितलं.
23 मार्चपासून दिल्लीतील रामलीला मैदानात अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. लोकपालासह शेतकऱ्यांचा मुद्दाही अण्णांच्या अजेंड्यावर असेल.
काय आहे लोकपाल विधेयक?
- सीबीआय, सीव्हीसी, पंतप्रधान हे लोकपालच्या कक्षेत
- खटल्याचा निकाल वर्षभरात लावला जाणार
- लोकपालच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही
- सीबीआय संचालकांची नियुक्ती पहिल्यासारखी होईल
- लोकपालच्या नियुक्तीसाठी आठ सदस्यांची समिती
- आठ सदस्यांच्या समितीत सुप्रीम कोर्टाचे चार निवृत्त न्यायाधीश
- राष्ट्रपती लोकपालला हटवू शकतील
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement