एक्स्प्लोर
Advertisement
कसा आहे अनिकेत कोथळेच्या मृत्यूचा घटनाक्रम?
अनिकेत कोथळेच्या मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंत एकूण 12 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांची कामगिरी संशयास्पद आहे, कसा आहे प्रकरणाचा घटनाक्रम...
सांगली : सांगलीतल्या अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी आत्तापर्यंत एकूण 12 पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह, ठाणे अंमलदार आणि त्याच्या मदतनीसाचाही समावेश आहे. अनिकेतच्या मृत्यूपाठीमागे सेक्स रॅकेट असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्याच्या हत्येसाठी पोलिसांनीच सुपारी घेतली असल्याचा आरोप अनिकेतच्या भावाने केला आहे. पण नक्की काय आहे हे प्रकरण आणि यातील अनिकेतच्या मृत्यूचा घटनाक्रम काय? हे आता समोर येऊ लागलं आहे. अतिशय नाट्यपूर्ण या घटनेत पोलिसांच्या एका पथकाने अनिकेत कोथळेच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे.
अनिकेतच्या मृत्यूचा घटनाक्रम
हरभट रोडवरील लकी बॅग हाऊस या दुकानामध्ये एक महिन्यापूर्वीच अनिकेत कोथळे कामाला लागला होता.
- 4 नोव्हेंबर 2017 : अनिकेतला अटक होण्याच्या एक दिवस आधीच बॅग हाऊसच्या मालकासोबत त्याचे भांडण झाले होते, असं त्याच्या भावाचं म्हणणं आहे.
- 5 नोव्हेंबर 2017 : अनिकेतने त्याच्या मित्रासोबत चोरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याच्यासह त्याचा मित्र अमोल भंडारेला 5 नोव्हेंबर रोजी अटक केली होती.
- 6 नोव्हेंबर 2017 : यानंतर 6 तारखेला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अनिकेतवर थर्ड डिग्री वापरल्याने, त्यातच त्याचा मृत्यू झाला.
- 6 नोव्हेंबर 2017 : अनिकेतच्या मृत्यूनंतर तब्बल दोन तासानंतर म्हणजे, रात्री 11 वाजता मयत अनिकेत आणि अमोलला कोठडीतून बाहेर काढलं.
- 7 नोव्हेंबर 2017 : अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी, पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेने पहाटे 4 पर्यंत सांगली शहरात भटकंती केली.
- 7 नोव्हेंबर 2017 : पहाटे 4 नंतर कामटेने नसरुद्दीन मुल्लाला अनिकेतचा मृतदेह कृष्णा नदीच्या घाटावर नेण्यास सांगितलं.
- 7 नोव्हेंबर 2017 : त्यानुसार पोलीस गाडीत अनिकेतचा मृतदेह आणि अमोल भंडारेला घेऊन नसरुद्दीन मुल्ला घाटावर आला. यावेळी त्यांच्यासोबत 27 व 19 वर्षाचे दोन तरुण होते, अशी माहिती समोर येत आहे.
- 7 नोव्हेंबर 2017 : पण कृष्णा काठावर योग्य जागा मिळाली नसल्याने, आणि सकाळ होण्यास सुरुवात झाल्याने, सांगलीपासून 150 किमी दूर असलेल्या सिंधुदुर्ग जिह्यातील आंबोलीमध्ये अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय कामटेच्या टीमने घेतला.
- 7 नोव्हेंबर 2017 : आंबोलीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरल्यानंतर, अंकली-हरिपूर रस्त्यावर पोलीस गाडीतून मृतदेह काढून, तो हवालदार अनिल लाडच्या मोटारीत घातला, अशी माहिती तपासातून पुढे येत आहे.
- 7 नोव्हेंबर 2017 : तेथून ते अंकलीत गेले. तेथील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरलं. आणि पुढे कागल, निपाणीमार्गे चार तासाच्या प्रवासानंतर ते आंबोलीत पोहोचले, अन् तिथेच मृतदेह जाळण्यात आला.
- 7 नोव्हेंबर 2017 : यानंतर सकाळी अनिकेत आणि त्याचा मित्र अमोल भंडारेने पोलीस कोठडीतून पलायन केल्याचा बनाव पोलिसांनी रचला.
- 8 नोव्हेंबर 2017 : पण हा बनाव लगेच समोर आला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास तत्काळ सीआयडीकडे सोपवण्यात आला. तर दुसरीकडे युवराज कामटेसह एकूण पाच पोलिसांना निलंबित करुन, त्यांना अटक करण्यात आली.
- 11 नोव्हेंबर 2017 : आज म्हणजे 11 नोव्हेंबर रोजी ठाणे पोलीस अंमलदार आणि मदतनीसासह एकूण 7 पोलिसांना याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे.
सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement