Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची विजयी आघाडी
Andheri Bypolls Result 2022: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे (Andheri Bypolls Results 2022) 3 नोव्हेंबरला मतदान झालं. आज निकाल जाहीर होणार आहे.
LIVE
Background
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील '166 अंधेरी पूर्व' या मतदार संघाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेचा भाग असणाऱ्या मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सुसज्ज असून आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यानुसार व्यवस्थापन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे 3 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाले. या मतदानानंतर रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी 200 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे 300 अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच 20 सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.
या मतमोजणी प्रक्रियेला निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांचे अधिकृत व नोंदणी झालेले प्रतिनिधी देखील उपस्थित असतात. या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपले प्रतिनिधी म्हणून 15 व्यक्तींना नेमता येते. 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.
आज सकाळी आठ वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 8.30 वाजता 'ईव्हीएम' यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) असणार असून, 'ईव्हीएम' आधारित मतमोजणीसाठी 14 मेज असणार आहेत. मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन' वर देखील दाखविण्यात येणार आहे; अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी यानिमित्ताने दिली आहे.
Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं
Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी विजयी आघाडी घेतली आहे. अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं मिळाली आहे.
18 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी
- ऋतुजा लटके - 65335
- बाळा नाडार - 1485
- मनोज नायक - 875
- मीना खेडेकर - 1489
- फरहान सय्यद - 1058
- मिलिंद कांबळे - 606
- राजेश त्रिपाठी - 1550
- नोटा - 12691
एकूण मतमोजणी - 85089
Andheri Bypolls 2022 Live Updates: ऋतुजा लटकेंना 55946 मतं
Andheri Bypolls 2022 Live Updates: पंधराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी
- ऋतुजा लटके -55946
- बाळा नाडार -1286
- मनोज नाईक - 785
- मीना खेडेकर - 1276
- फरहान सय्यद - 932
- मिलिंद कांबळे - 546
- राजेश त्रिपाठी - 1330
- नोटा - 10906
एकूण मतमोजणी - 73007
Andheri Bypolls 2022 Live Updates: ऋतुजा लटकेंनी 50 हजार मतांचा तर नोटाच्या मतांनी दहा हजार मतांचा टप्पा ओलांडला
Andheri Bypolls 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल
चौदाव्या फेरीअंती एकूण मतमोजणी
- ऋतुजा लटके -52507
- बाळा नाडार -1240
- मनोज नाईक - 748
- मीना खेडेकर - 1190
- फरहान सय्यद - 897
- मिलिंद कांबळे - 519
- राजेश त्रिपाठी - 1291
- नोटा - 10284
एकूण मतमोजणी - 68676
Andheri Bypolls 2022 Live Updates: अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंची विजय आघाडी , शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांकडून जल्लोष
Shiv Sena Celebration : ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित आहे हे समजल्यानंतर शिवसेना भवनाजवळ कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. तर ऋतुजा लटके यांच्या विजयाचां पंढरपुराही सेलिब्रेशन करण्यात आले आहे. पंढरपुरात युवासेना जिल्हाध्यक्ष गणेश इंगळेंच्या नेतृत्वात शिवसेैनिकांकडून एकच जल्लोष करण्यात आला आहे. पेढे वाटून फटाक्यांची अतिषबाजी करत विजयाचं सेलिब्रेशन केले आहे.
पाहा व्हिडीओ
[yt]https://www.youtube.com/watch?v=_8UMp0fhEEI[/yt]
Andheri Bypolls 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत 59 हजार मतांची मतमोजणी पूर्ण
तेराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी
- ऋतुजा लटके -48015
- बाळा नाडार -1151
- मनोज नाईक - 708
- मीना खेडेकर - 1156
- फरहान सय्यद - 859
- मिलिंद कांबळे - 499
- राजेश त्रिपाठी - 1211
- नोटा - 9547
एकूण मतमोजणी - 63146