(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही', अमृता फडणवीसांच भाई जगतापांना प्रत्युत्तर
मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाचा आधारावर वर्ग केली होती. याच उत्तर द्यावं, असा सावाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केला आहे.
मुंबई : नेहमीच ट्विटरवर चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ट्वीट करताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाचा आधारावर वर्ग केली होती. याच उत्तर द्यावं, असा सावाल भाई जगताप यांनी उपस्थित केला होता. या प्रश्वाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी भाई जगताप यांचा एकेरी उल्लेख केलाय. तसंच सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही, असंही त्या ट्वीटमध्ये म्हणाल्या. दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्वीटमधील भाई जगतापांच्या एकेरी उल्लेखांची चांगलीच चर्चा रंगली आहे.
अमृता फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या,भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही!
ए भाई , तू जो कोण असशील - माझ्या वर बोट उचलायचं न्हाय !
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 22, 2021
पोलिसांची खाती तुमच्याच राज्यत तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक ‘ ला योग्यता पाहून दिली होती !
लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय ! @BhaiJagtap1 https://t.co/tny1xz4cMF
राज्यात सध्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे, माझा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सवाल आहे की त्यांनी सत्तेत असताना राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली याचं उत्तर द्यावं. फडणवीस यांनी तब्बल 21 जणांना त्यांच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपातून क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत काय बोलणार असं देखील भाई जगताप 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाले.
संबंधित बातम्या :
पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत कोणत्या आधारावर वर्ग केली; भाई जगताप यांचा फडणवीस यांना सवाल