Amrit Bharat Station Scheme : मराठवाड्यातील 14 रेल्वे स्थानकांचा अमृत भारत योजनेत समावेश; पाहा संपूर्ण यादी
Amrit Bharat Station Scheme: याचा मोठा फायदा आगामी काळात मराठवाड्याच्या विकासासाठी होणार आहे.
Amrit Bharat Station Scheme: रेल्वे स्थानकांच्या (Railway Station) आधुनिकीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या अमृत भारत स्थानक योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. या योजनेत महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. अमृत भारत स्थानक योजनेतून निर्माण होणाऱ्या सुविधांमुळे रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. शिवाय प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील रेल्वे स्थानकांचा समावेश झाल्यामुळे राज्यातील रेल्वे स्थानकांमध्ये विविध सुविधा निर्माण होणार आहेत. दरम्यान, अमृत भारत स्थानक योजनेत मराठवाड्यातील (Marathwada) 14 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, याचा मोठा फायदा आगामी काळात मराठवाड्याच्या विकासासाठी होणार आहे.
मराठवाड्याचा रेल्वे स्थानक आणि मिळालेला निधी...
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव | रेल्वे स्थानकाचे नाव | निधी (कोटीत) |
1 | बीड | परळी | 24.4 |
2 | हिंगोली | हिंगोली डेक्कन | 19.5 |
3 | जालना | जालना | 182 |
4 | जालना | परतूर | 22.8 |
5 | लातूर | लातूर | 20 |
6 | नांदेड | मुदखेड | 23.1 |
7 | नांदेड | किनवट | 23 |
8 | नांदेड | औरंगाबाद | 359 |
9 | उस्मानाबाद | उस्मानाबाद | 21.6 |
10 | परभणी | परभणी जंक्शन | 25.9 |
11 | परभणी | गंगाखेर | 24 |
12 | परभणी | पूर्णा जंक्शन | 23.7 |
13 | परभणी | सेलू | 23.2 |
14 | लातूर | लातूर | 20 |
अमृत भारत स्टेशन अंतर्गत लातूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील 508 रेल्वे स्थानकांच्या पूर्णविकासाचा शुभारंभ झाला. यासाठी लातूर रेल्वे स्टेशन वर भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दम्यान लातूरच्या रेल्वे स्थानकासाठी 20 कोटींचा निधी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत जालना येथील रेल्वे स्थानकांवर हा कार्यक्रम पार पडला आहे.
अमृत भारत स्थानक योजनेतील राज्यात्तील रेल्वे स्थानक
- सोलापूर रेल्वे विभाग – अहमदनगर, दौंड, कोपरगाव, कुर्डुवाडी जंक्शन, लातूर, उस्मानाबाद, पंढरपूर, सोलापूर
- पुणे रेल्वे विभाग - आकुर्डी, कोल्हापूर, तळेगाव
- भुसावळ रेल्वे विभाग – बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, मनमाड, शेगाव
- नागपूर रेल्वे विभाग – वडसा, गोंदिया, चांदाफोर्ट, बल्लारशाह, चंद्रपूर, धामणगाव, गोधनी, हिंगणघाट, काटोल, सेवाग्राम, नरखेड, पुलगाव
- मुंबई रेल्वे विभाग – कांजुरमार्ग, परळ, विक्रोळी
- नांदेड रेल्वे विभाग – औरंगाबाद, गंगाखेड, हिंगोली डेकन, जालना, किनवट, मुदखेड, नगरसोल, परभणी, परतूर, पूर्णा, सेलू, वाशिम
- सिकंदराबाद रेल्वे विभाग – परळी वैजनाथ
मुख्यमंत्र्यांची प्रतिकिया...
‘अमृत भारत स्थानक’ योजनेमुळे रेल्वे स्थानकांचे पुनरुज्जीवन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विविध पायाभूत सुविधांच्या नव्या अध्यायाची नोंद रेल्वेच्या इतिहासात होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: