एक्स्प्लोर

Amravati : आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर रेल्वे स्टेशन बंद करा; चांदूरमध्ये रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी जनआंदोलन

Amravati :  कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र विदर्भात अजूनही पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत.

अमरावती : आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर रेल्वे स्टेशन बंद करा या घोषणेने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहर शनिवारी दणाणलं. दहा फुटांचे कुलूप, तीन फुटांची चावी तसेच बैलगाड्या आणि टांग्यांची मिरवणूक आणि शेकडो नागरिकांचा सहभाग. निमित्त होतं रेल रोको कृती समितीचे आंदोलन. रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी भव्य जनआंदोलन करून रेल्वे अधिकाऱ्यांना कुलूप भेट देण्यात आले. यामध्ये सर्व राजकीय पक्ष, संघटना तसेच शहरवासीय सामील झाले होते. काही व्यापारी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनात सहभागी झाले होते.

मुंबईत जसं लोकल रेल्वेला महत्व आहे तेच महत्व विदर्भात पॅसेंजर रेल्वेला आहे. कोरोना काळानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्यातील रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. मात्र विदर्भात अजूनही पॅसेंजर गाड्या सुरू झाल्या नाहीत. ज्या सुरू झाल्या त्या स्थानकावर थांबतच नसल्याने प्रवाशी चांगलेच संतापले आहे. 

ज्या गाड्या सुरू झाल्या त्या रेल्वे गाड्यांचा पूर्ववत थांबा केवळ चांदूर रेल्वेलाच देण्यात आला नाही. सर्व गाड्यांचा स्थानिक रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा, अन्यथा स्टेशन बंद करण्यात यावे, यासाठी काल 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीदिनी चांदूर रेल्वे स्टेशन मास्तर यांना कुलूप भेट दिली. यासाठी तब्बल 10 फूट एका भल्यामोठ्या कुलुपाची मिरवणूक चांदूर रेल्वे शहरातून काढण्यात आली.

चांदूर रेल्वे स्थानकावर टाळेबंदीपूर्वी विदर्भ एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस, हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, कुर्ला  एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा होता. मात्र आता या सर्व रेल्वेगाड्या सुरू होऊनही चांदूर रेल्वे स्थानकावर केवळ विदर्भ एक्सप्रेसचाच थांबा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या गाड्यांचा थांबा देण्यात आला नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्र एक्सप्रेस (01039) ही सिंधी सारख्या छोटया स्थानकावर थांबा घेते. परंतु चांदूर रेल्वे शहरात ही गाडी थांबत नाही. त्यामुळे या आंदोलनाला पाठिंबा देऊन सर्व नागरिक, सर्व पक्षाचे, संघटनेचे तथा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

या अन्यायाविरूध्द सदर आंदोलन गांधी जयंतीदिनी करण्यात आले. आंदोलनात महात्मा गांधीजींच्या वेशभूषेत कमलकिशोर पनपालीया होते. येत्या पंधरा दिवसात पूर्ववत रेल्वे गाड्यांचा थांबा न मिळाल्यास यापेक्षा उग्र रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिला..

पूर्वी चांदूररेल्वे येथे या रेल्वे गाड्यांचा थांबा होता, पण आता या गाड्या चांदूर स्थानकावर थांबत नाहीत. 

विदर्भ एक्सप्रेस
महाराष्ट्र एक्सप्रेस
हावडा- अहमदाबाद एक्सप्रेस
सेवाग्राम एक्सप्रेस
कुर्ला एक्सप्रेस 
अमरावती - जबलपूर
अमरावती - नागपूर सुपरफास्ट

या पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी 

वर्धा - भुसावळ
अमरावती - नागपूर 
नागपूर - भुसावळ

महत्वाच्या बातम्या : 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget