Amravati News : मोठी बातमी! डीएपी खतांच्या बॅगेत चक्क माती, शेतकऱ्यांना 5400 बॅग विकल्या; पुण्यातील कंपनीविरुद्ध गुन्हा
Amravati News : शेतकर्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणात आल्याच्या धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये (Amravati News) उघडकीस आला आहे.
Amravati News : सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला देखील गती प्राप्त झाली असून बळीराजा (Farmer) शेतीच्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र आहे. अशातच आता शेतकऱ्यांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या कंपनीवर परत एकदा कृषी विभागाने मोठी कारवाई केलीय. शेतकर्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणात आल्याच्या धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये (Amravati News) उघडकीस आला आहे.
शेतकर्यांच्या कष्टाची माती करणाऱ्या या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई करत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह बोगस खते आणि बियाणे विकणार्यामध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
453 खतांची पोती जप्त, पुण्यातील कंपनीविरुद्ध गुन्हा
अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. यात एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता, त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकिस आलं आहे. पुण्यातील खत निर्माण करणारी "रामा फर्टीकेम लिमिटेड" या कंपनीने अमरावती जिल्ह्यात 3 हजार 300 बॅग डीएपी आणि 10 : 26 : 26 या खताच्या 2100 बॅग अशा 5 हजार 400 खतांच्या बॅगची विक्री केली आहे. यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आता या कंपनीचे 453 खतांची पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये पुणे येथील रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर खत विक्री करणाऱ्या कंपनी आणि विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
18 हजार हेक्टरवरील शेत पिकांचं नुकसान
भंडारा जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीतमुळं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका पवनी आणि लाखांदूर तालुक्याला बसलेला आहे. या अतिवृष्टीचा जिल्हा प्रशासनानं नजर अंदाज अहवाल तयार केला आहे. त्यात, 239 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून 39 हजार 141 शेतकऱ्यांचं सुमारे 18 हजार हेक्टरमधील शेतपिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं 315 घरांचं आणि 16 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. 681 घरांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं पुराचं पाणी शिरलं. नुकसान झालेल्या शेतीकांमध्ये भात पीक, सोयाबीन, तूर, कापूस, भाजीपाला यांचा मुख्य समावेश आहे यासोबतच व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही नजर अंदाज आकडेवारी असून सर्वेक्षण झाल्यानंतर नेमकी आकडेवारी समोर येणार आहे.
हे ही वाचा