Amravati :अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात आग, जीवितहानी नाही; 37 बालकांचे प्राण थोडक्यात बचावले
अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Amravati Women Hospital) आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली.
Amravati Hospital Fire: अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयात (Amravati Women Hospital) आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. लहान मुलांच्या बालक अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटर मशीनला अचानक आग लागली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दोन लहान बालकं किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल रुग्णालयात दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेची सखोल चौकशी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी प्रशासनाला दिले आहेत.
अमरावती स्त्री रुग्णालयात आज सकाळी 9 वाजता लहान मुलांच्या बालक अतिदक्षता कक्षातील व्हेंटिलेटरला अचानक शॉटसर्किटमुळे आग लागली. यावेळी त्या वार्डात तब्बल 37 लहान बालक उपचार घेत होते. डॉक्टरांचा राउंड सुरू होता. आग लागल्याचं पाहून तातडीने सगळ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी बालकांना बाहेर काढले. धुरामुळे बालकांना त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या वार्डात हलविले तर दोन बालकांना इजा झाल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर लहान मुलांना तातडीने दुसऱ्या वार्डात शिफ्ट कऱण्यात आले. दोन बालके किरकोळ जखमी झाली असून तातडीने त्यांना पंजाबराव देशमुख रुग्णालयात हलविले आहे.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती घेतली आहे.
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) September 25, 2022
सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.
या घटनेची सखोल चौकशी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आमदार यशोमती ठाकूर रुग्णालयात पाहणी करण्यासाठी दाखल झाले. शिवाय भाजप आमदार प्रवीण पोटे आणि आमदार रवी राणा रुग्णालयात पाहणी करण्यासाठी दाखल झाले. खासदार नवनीत राणा यांनी देखील हॉस्पीटलची पाहणी केली.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती जिल्हाधिकारी यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतली आहे. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. या घटनेची सखोल चौकशी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या