Amravati : खवय्यांसाठी खूशखबर! तब्बल 70 प्रकारचे लोणचे तेही एकाच छताखाली; दर्यापुरात लोणचे महोत्सवाचं आयोजन
Amravati : चविष्ट 70 प्रकारच्या लोणच्यांचा महोत्सव प्रथमच अमरावतीच्या दर्यापुरात आयोजित करण्यात आला आहे.
Amravati : लोणचे म्हटले की आंबट, तुरट, खारट अशा अनेक विविध चवींच्या आठवणीने तोंडाला पाणी सुटते. अशाच चविष्ट 70 प्रकारच्या लोणच्यांचा महोत्सव प्रथमच अमरावतीच्या दर्यापुरात आयोजित करण्यात आला आहे. दर्यापूर येथील खवय्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या नम्रता शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी या लोणचे महोत्सवाचे आयोजन केले आहे.
नम्रता शाह यांनी मागील काळात मुंबई येथील मेळाव्यात सुद्धा खवय्येगिरीची लज्जत सादर केली होती. यात त्यांना पारितोषिक मिळाले आहे. विविध प्रकारच्या रेसिपी, आकर्षक केक, राखी बनविणे, पिझ्झा तयार करून विकणे, विविध प्रकारचे लोणचे आदींच्या माध्यमातून त्यांनी केवळ दर्यापुरातच नव्हे तर परदेशात सुद्धा आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. परदेशातून त्यांच्या लोणच्यांना खास मागणी असल्याने यंदा त्यांनी लोणचे महोत्सवाचे आयोजनच दर्यापूरमध्ये केले आहे.
मॅक्सिको तर्फे नम्रता शहा यांचे 'अन्नपूर्णा अचार' निवडले
अमरावतीच्या दर्यापुरातील नम्रता शहा या गृहिणीने आपल्या परिश्रमातूनच खमंग स्वादिष्ट लोणचे बनविण्याचे ठरविले. अन्नपूर्णा कुकिंग सेंटरची स्थापना केली. या माध्यमातूनच मग केक बनविणे, बर्थ डे पार्टीची व्यवस्था करणे आदी उपक्रमातून आपल्यातील उद्योजकांच्या गुणांचा परिचय परिसराला करून दिला. अशात मुंबई येथे मॅक्सिको कंपनीद्वारे भारतातील काही वस्तू निवडण्यासाठी प्रदर्शन भरविले गेले. 2015 साली भरलेल्या या प्रदर्शनाला उपस्थित राहून नम्रता शहा यांनी त्यांनी तयार केलेल्या काही वस्तूंसह अन्नपूर्णा आचार ठेवले. यामधून मॅक्सिको तर्फे नम्रता शहा यांचे 'अन्नपूर्णा अचार' निवडले ते एकमेव. अनेक वर्षांच्या तपश्चर्येचे हे मोठे फळ असल्याचं नम्रता शाह यांनी सांगितलं.
आंबा, लिंबू, मिरची, भोकर, आवळा, गाजर अशा अनेक लोणच्यांनी मॅक्सिको कंपनीला घायाळ केले. नम्रता शहा यांनी याअगोदर नातेवाइकांच्या माध्यमातून सौदी अरबपर्यंत लोणच्याची चव दिली. पुण्या मुंबईमधील फाइव्ह स्टार हॉटेल मध्ये सुद्धा आता मागणी यायला लागली असून यशस्वी उद्योजिका बनण्याच्या मार्गावर नम्रता शहा यांची वाटचाल कौतुकास्पद असल्याचे मत दर्यापूर येथील महिलांनी व्यक्त केले.
नम्रताचे पती राजेश शहा यांना अश्रू अनावर
नम्रता शहा यांच्या यशाबद्दल जेंव्हा त्यांचे पती राजेश शहा यांना विचारले असता ते अत्यंत भावुक झाले. नम्रता आणि राजेश यांचा प्रेम विवाह. मात्र घरच्यांचा विरोध असल्याने त्यांना काही काळ घरच्यांपासून दूर राहावे लागले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही नम्रता आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहिल्याचे ते सांगतात. दोघंही एकमेकांच्या सहकार्याने नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या नम्रता यांनी आपल्यात असलेल्या पाककलेच्या गुणांचा उपयोग केला आणि विविध प्रकारचे लोणचे तयार करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय बेकरी उद्योगात देखील त्यांनी विविध प्रकारचे पदार्थ तयार करणे सुरू केले. आज आमची परिस्थिती बदलली आहे ती केवळ नम्रता यांच्या प्रचंड आत्मविश्वास आणि मेहनतीमुळेच. माझ्या पत्नीवर साक्षात माता अन्नपूर्णा देवीची कृपा असल्याचं राजेश शहा म्हणाले. दरम्यान त्यांना अश्रू अनावर झाले.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar: लतादीदींच्या स्मरणार्थ पोस्टाचं तिकीट प्रकाशित करणार; केंद्र सरकारची घोषणा
Maharashtra Corona Update : राज्यात करोना संसर्गाचा आलेख येतोय खाली; बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के
Oscar Awards 2022 : 'ऑस्कर नामांकनाच्या यादीत 'द पॉवर ऑफ डॉग' या सिनेमाला सर्वाधिक नामांकन, 'जय भीम' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाद
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha