(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात करोना संसर्गाचा आलेख येतोय खाली; बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के
Maharashtra Corona Update : राज्यात आज 57 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 6 हजार 107 नव्या रुग्णांची भर पडली असून 57 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 16 हजार 035 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 57 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 57 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख 73 हजार 069 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के आहे. सध्या राज्यात 6 लाख 39 हजार 490 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2412 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 57 लाख 68 हजार 634 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत 447 नवे कोरोना रुग्ण
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 447 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 783 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 808 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत 48 दिवसांची वाढ यात झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.09% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या