बस दरीत जात असताना चालकाने केला अडवण्याचा प्रयत्न, पण...धक्कादायक घटनेनं अमरावती हादरलं
चिखलदराच्या घाटात उभी असलेली ट्रॅव्हलर बस उतारावर दरीत जात असताना गाडी अडवण्याच्या नादात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Amravati Accident : अमरावती (Amravati Accident) जिल्ह्यातील चिखलदरा घाटात धक्कादायक घटना घडली आहे. चिखलदराच्या घाटात उभी असलेली ट्रॅव्हलर बस उतारावर दरीत जात असताना गाडी अडवण्याच्या नादात ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन प्रवाशांनी सुद्धा ती बस ट्रॅव्हलर अडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्ये दोन प्रवासी सुद्धा जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. .
नेमकं काय घडलं?
ट्रॅव्हलर बसमध्ये एकाला उलटी आल्याने त्या ठिकाणी सर्व प्रवासी खाली उतरले होते. तेव्हा गाडी उताराच्या दिशेने उभी केली असता ती गाडी उताराहून खाली थेट दरीत जात होती. तेव्हा ड्रायव्हरने त्या गाड़ीला अडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ती बस ड्रायव्हरच्या अंगावरुन गेली. यामध्ये ड्रायव्हरच्या जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन प्रवाशांनी सुद्धा ती बस ट्रॅव्हलर अडवण्याचा प्रयत्न केला असता दोन प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत.
सिन्नरला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू
सिन्नरला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (horrific accident in Samruddhi Expressway) घडला आहे. टायर फुटल्यामुळे किया करेन्स ही गाडी महामार्गावर उलटून ट्रकला धडकली. या अपघातात दोघेजण दगावले असून एकूण नऊ जखमींचा समावेश आहे. तीन प्रौढ आणि आठ लहान मुले असे एकूण 11 जण या गाडीतून प्रवास करत होते. प्रौढांमधील एक पुरुष तर एक महिला यामध्ये दगावले आहेत. सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे विवाह सोहळ्यानिमित्त आलेल्या कल्याण येथील नातेवाईकांवर ही दुर्दैवी वेळ ओढवली आहे. सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारात येणाऱ्या समृद्धी महामार्गावर हा भीषण अपघात घडला. यात गाडी पूर्णतः चक्काचूर झाल्याचे बघायला मिळते आहे.
अपघातात जखमी झालेल्यांवर सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्यांवर सिन्नरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिघांना उपचारासाठी नाशिक येथे हलवले होते. दोन खाजगी बस आणि एक चार चाकी असा तीन वाहनातून प्रवास सुरू होता. बालकांचा समावेश असलेल्याच गाडीला अपघात झाल्याने शोकाकुल आणि भयावह वातावरण आहे. एक वाजता अपघात झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरील खाजगी बस चार वाजेपर्यंत देखील जखमी पर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. घटनेचा अधिक तपास सिन्नर पोलीस करत आहेत. महत्तम डोक्याला इजा झालेल्या बालकांवर सिन्नर मध्ये उपचार सुरू आहेत.
























