Yugendra pawar Tanishka Prabhu : जयनंतर आता युगेंद्र पवारांनी सुद्धा नंबर मारला, आजोबांचा सल्ला मनावर घेतला; होणारी पत्नी तनिष्का आहे तरी कोण?
Yugendra Pawar Tanishka Prabhu : युगेंद्र पवार यांचा नुकताच तनिष्का प्रभू यांच्यासोबत साखरपुडा झालाय. सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Yugendra Pawar Tanishka Prabhu : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा धाकटा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा 10 एप्रिल रोजी ऋतुजा पाटील (Rutuja Patil) यांच्या सोबत साखरपुडा पार पडला होता. यानंतर पवार कुटुंबातील युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती. कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी युगेंद्र पवार यांच्या वाढदिवशी आता किती दिवस एकट्याचेच अभिनंदन करायचे, आम्हाला अक्षता टाकायच्या आहेत. आता फार लांबवू नका, अशा हटके शुभेच्छा त्यांना दिल्या होत्या. आता जय पवार यांच्यानंतर युगेंद्र पवार यांनी नंबर लावलाय. त्यांचा नुकताच तनिष्का प्रभू (Tanishka Prabhu) यांच्यासोबत साखरपुडा झालाय.
युगेंद्र पवारांच्या होणाऱ्या पत्नी आहे तरी कोण?
युगेंद्र पवार यांचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे. सुप्रिया सुळे यांनी इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली आहे. युगेंद्र पवार हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. युगेंद्र पवार यांचा तनिष्का प्रभू यांच्यासोबत घरगुती पध्दतीने साखरपुडा झाला आहे. तनिष्का प्रभू या मूळच्या मुंबईच्या आहेत. तनिष्का यांचे शिक्षण परदेशात फायनान्स क्षेत्रात झाले आहे.
View this post on Instagram
युगेंद्र पवार कोण आहेत?
युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. त्यांचा जन्म 22 एप्रिल 1991 रोजी झाला आहे. अमेरिकेतील नॉर्थ ईस्टर्न विद्यापीठातून फायनान्स-इन्शुरन्स विषयात पदवीचे शिक्षण घेतले आहे. ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत. शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेचे खजिनदारपदाची जबाबदारी आहे. शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेले आहे. युगेंद्र पवार हे बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. विधानसभा निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवले होते. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे.
आणखी वाचा
























