Anil Deshmukh : आमच्याकडे आमदार अन् इच्छुक उमेदवारांची मोठी रिघ, चाचपणी करून योग्य निर्णय घेऊ; माजी गृहमंत्र्यांचा दावा
Maharashtra Politics : आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आमदार आणि इच्छुक उमेदवारांची रीघ लागली आहे, आम्ही चाचपणी करून योग्य तो निर्णय घेऊ. असा दावा शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
![Anil Deshmukh : आमच्याकडे आमदार अन् इच्छुक उमेदवारांची मोठी रिघ, चाचपणी करून योग्य निर्णय घेऊ; माजी गृहमंत्र्यांचा दावा We have a large list of MLAs and interested candidates we will check and make the right decision Former home minister anil deshmukh claim maharashtra politics maharashtra marathi news Anil Deshmukh : आमच्याकडे आमदार अन् इच्छुक उमेदवारांची मोठी रिघ, चाचपणी करून योग्य निर्णय घेऊ; माजी गृहमंत्र्यांचा दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/16/e834718e91346d36cc570191f75942c81721121444265892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News नागपूर : भाजप (BJP) आपला फायदा बघून दुसऱ्याचा फक्त वापर करत फायदा घेत असते. जोपर्यंत ज्याची चलती असते तोपर्यंत त्याचा उपयोग करून घेत असते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या (Ajit Pawar) कमी जागा आल्यामुळे आपल्याला फायदा ऐवजी नुकसानच झाल्याच्या चर्चा आहे. त्यामुळे ते कुठल्याही पक्षाला बाजू करायच्या मनस्थितीत आहे. वेळप्रसंगी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही वेगळे वेगळे लढण्याचे सांगू शकतात.
अजित पवार (Ajit Pawar) गटाचा आपल्याला फायदा होत नसेल तर, तर त्यांना बाजूला काढायचं म्हणून अजित पवार यांना तिसरी आघाडी करण्यचे देखील ते त्यांना सांगू शकतात, अशी चर्चा नुकत्याच झालेल्या अधिवेशनात होती. त्यामुळे काहीही होऊ शकतं. तर दुसरीकडे आमच्या कडे मोठ्या प्रमाणात आमदार आणि इच्छुक उमेदवारांची रीघ लागली आहे, आम्ही चाचपणी करून योग्य तो निर्णय घेऊ. असा दावा राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या असतील तर त्यात काय नवल
छगन भुजबळ यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच मंगळवारी अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार पुण्यातील मोदीबागेत (Modibaug) पोहोचल्याने राजकीय वर्तुळाला दुसरा धक्का बसतो की काय, असे वाटत होते. त्या अचानक शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला का पोहोचल्या, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीला गेले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, सुनेत्रा पवार मोदी बागेत गेल्या असतील तर त्यात काय नवल, तिथे 50 फ्लॅट आहेत त्या इतरत्र पण जाऊ शकतात. मला वाटत नाही त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असेल असा अंदाजही त्यांनी बोलताना व्यक्त केलाय.
निलेश लंकेचा ओढा कायम शरद पवारांकडेच होता
राज्यातील आगामी विधानसभेसाठी आम्ही देखील 288 जागांवर सर्व्ह करत आहोत. सर्वेच्या आधारावर ज्या ठिकाणी आमचे बळ अधिक आहे त्या अनुषंगाने आम्हाला जागा वाटप करता येईल असेही अनिल देशमुख म्हणाले. निलेश लंके यांना अजित पवार शरद पवारांकडे पाठवू शकत नाही. विकास काम मिळतील म्हणून ते अजित पवार कडे गेले असतील, त्यांचा ओढा शरद पवार कडेच होता, असाही दावाही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी बोलताना व्यक्त केले आहे.
संबधित बातम्या -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)