Zero Hour Guest Centre | ठाकरेंचे खासदार फुटणार? Sanjay Jadhav आणि Naresh Mhaske गेस्ट सेंटरवर
Zero Hour Guest Centre | ठाकरेंचे खासदार फुटणार? Sanjay Jadhav आणि Naresh Mhaske गेस्ट सेंटरवर
ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांच्या शेजारी बसलेले खासदार संजय जाधव.. उर्फ बंडू जाधव यांच्याकडूनच नेमकं या सुरु आहे ठाकरेंच्या खासदारांच्या मनात.. हे समजून घेणार आहोत.. आणि त्याचबरोबर आपल्यासोबत असणार आहेत शिवसेना खासदार नरेश मस्के...दोन्ही मान्यवरांशी चर्चा करण्यासाठी.. जावूयात गेस्ट सेंटरला...
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार असं दिसतंय. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकदोन नाही सहा खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय... केंद्रातही भाजपची सत्ता असणं... आणि त्यामुळं निधी मिळण्यात अडचणी येण्याची भीती ही यामागची प्रमुख कारणं असल्याचं सांगण्यात येत आहे...
यावर कुणाच्या मनात असाही विचार येऊ शकतो की हा आकडा सहाच का आहे. त्याचं कारण असं की पक्षांतर बंदी कायद्यातून सुटण्यासाठी किमान दोन तृतीयांश आमदार किंवा खासदारांना एकाच वेळी पक्ष सोडावा लागतो. विद्यमान लोकसभेत ठाकरेंचे नऊ खासदार आहेत. नऊ या संख्येच्या त्याच्या दोन तृतीयांश म्हणजे संख्या येतो सहा.
ठाकरेंच्या शिवसेनेनं ही चर्चा खोडून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं खासदार मंडळी नवी दिल्लीत आहेत. त्यामुळं ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी चर्चा खोडून काढण्यासाठी घाईघाईनं पत्रकार परिषद घेऊन आपल्यातली एकी दाखवली. आमच्यातला एकही खासदार फुटणार नाही, आम्ही सगळे ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक आहोत असं हे खासदार सांगत होते.
शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना मात्र हे मान्य नाही. सहा खासदार तर येतीलच, त्याशिवाय येत्या तीन महिन्यांमध्ये १० ते १२ माजी आमदार आमच्यासोबत येतील असा दावा उद्योगमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे बडे नेते उदय सामंत यांनी केला आहे.






















