एक्स्प्लोर

बिहार निवडणक एक्झिट पोल 2025

(Source:  Poll of Polls)

Transgender Wedding : बीडचा तरूण तृतीयपंथीयाशी बांधणार लग्नगाठ! सपना-बाळूची अनोखी प्रेमकहाणी

एका तृतीयपंथीयासोबत (Transgender) विवाह करण्यासाठी हा तरुण पुढे आला आहे.

Transgender Wedding : बीड (Beed) मधील एका तरुणाने अनोखा निर्णय घेतला आहे. एका तृतीयपंथीयासोबत (Transgender) विवाह करण्यासाठी हा तरुण पुढे आला आहे. मागील अडीच वर्षांपासून बीडमधील किन्नर सपना आणि बाळू लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये आहेत. आता त्यांनी जागतिक महिला दिनाच्या (International Women's Day) पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.  

सपना आणि बाळूची अनोखी प्रेम कहाणी..

बाळू तोडमल हा तरूण जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. अशाच एका जागरण-गोंधळाच्या कार्यक्रमादरम्यान तृतीयपंथीय सपनाशी बाळूची भेट झाली. सपना ही मुळची बीडची असून कार्यक्रम संपवून बाळू आणि सपना एके दिवशी बीडमध्ये पोहोचले. बाळूला गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा गाडी नव्हती. यासाठी तो सपना सोबतच थांबला आणि इथूनच सपना आणि बाळूच्या अनोखी प्रेम कहाणीची सुरूवात झाली

एक तृतीयपंथीय दुसऱ्या तृतीयपंथीय सोबत लग्न केल्याच्या बातम्या आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. मात्र एका तृतीयपंथीय सोबत लग्नगाठ बांधण्याचा निर्णय एका सर्वसामान्य मुलांना घेतलाय. बीडच्या माळापुरी गावचा बाळू तोडमल आणि बीड शहरात राहणारी सपना एखाद्या चित्रपटातील लवस्टोरीला देखील लाजवेल अशी या दोघांची प्रेम कहाणी आहे. तृतीयपंथी असलेली सपना आणि  ढोलकी वाजवण्याच काम करणारा बाळू या दोघांची भेट एका जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात झाली. आणि इथूनच या दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली पहिल्याच भेटीत तृतीयपंथी असलेल्या सपना वर बाळूचा जीव जडला आणि त्याने थेट सपनाला लग्नाची मागणी घातली.

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला विवाह करण्याचा निर्णय

ज्या समाजाने कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही. तिथे लग्नाचा विचार करणं ही सपनाला स्वप्नवतच होतं. त्यामुळे पहिल्यांदा सपनाने बाळूला नकार दिला. तिने नकार दिल्यामुळे बाळूने आत्महत्येचा देखील प्रयत्न केला. हे सर्व कळल्यानंतर  सपनाने बाळूच प्रेम पाहून लग्नासाठी होकार दिला. मात्र समाज आणि कुटुंबातील लोक आपल्याला स्वीकारतील का? हा प्रश्न दोघांसमोर होता. लग्नासाठी असंख्य अडचणी येतील हे त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी बीडमधील काही पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली आणि आता बीडच्या पत्रकारांच्या सहकार्यातून 8 मार्चला महिला दिना दिवशी या दोघांचा विवाह पार पडणार आहे. 

समाजात आजही तृतीय पंथीयाना सन्मानाची वागणूक मिळत नाही. मात्र समाजातील रूढी परंपरेला झुगारून बाळूने सपनासोबत संसार थाठण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी किन्नर शिवलक्ष्मी आणि संजय झाल्टे यांनी विवाह केला होता. बीडमध्ये किन्नर सपना आणि बाळू आता वाजत-गाजत विवाह करणार आहेत. मराठवाड्यात बहुदा हा पहिलाच विवाह सोहळा असावा, मात्र या पूर्वी मनमाड मधल्या संजय खाडे याने किन्नर शिवलक्ष्मी सोबत विवाह केला होता. बाळू आणि सपना हे मागच्या अडीच वर्षापासून लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत. अडीच वर्षांमध्ये बाळूला अनेकांनी हिणवले. मात्र संसार मला करायचा आहे समाजाला नाही, असं म्हणून त्याने सपनावरचं प्रेम तसूभरही कमी होऊ दिले नाही.

बीड पत्रकार संघाच्या पुढाकाराने होणार विवाह सोहळा

किन्नर सपना आणि बाळूच्या या प्रेम प्रकरणाला बीड पत्रकार संघाने पुढाकारातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी आणि पत्रकार शेख आयशा यांनी सपना आणि बाळूच्या विवाह संदर्भात विशेष प्रयत्न केले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast Effect: 'दिल्ली ब्लास्ट नंतर Maharashtra ATS अॅक्टिव्ह', Pune च्या Kondhwa त छापेमारी
ATS Raids : Mumbra मध्ये ATS चे छापे, शिक्षक Ibrahim Abidi सह दोघांची कसून चौकशी.
Black Magic Menace: Kolhapur मध्ये भोंदूगिरी, स्थानिक निवडणुकीसाठी उमेदवारांवर करणी?
TOP 100 Headlines : Maharashtra Superfast : 12 PM : सुपरफास्ट बातम्या : 12 NOV 2025 : ABP Majha
NCP Alliance: 'Supriya Sule यांनी युतीचा प्रस्ताव दिला', Ajit Pawar गटाचे Yogesh Behl यांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट
Leopard In Kolhapur: बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
बिबट्यानं कोल्हापुरात भरवस्तीत धुमाकुळ घातल्यानंतर गगनबावडा तालुक्यातही हैदोस; हल्ल्यात बैल ठार
दिल्ली स्फोटानंतर हाय अलर्ट; नाकाबंदीत रोहतक पोलिसांना कारमध्ये आढळली मोठी रोकड
दिल्ली स्फोटानंतर हाय अलर्ट; नाकाबंदीत रोहतक पोलिसांना कारमध्ये आढळली मोठी रोकड
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट
Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं
Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा
Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा
Embed widget