एक्स्प्लोर

Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात उत्तम मोहितेंना गुप्तीचे वार करुन संपवणारे 8 आरोपी कोण? मोहितेंच्या लेकीने 'त्या' भाईचं नाव घेतलं

Sangli Crime news: सांगलीत वाढदिवसाच्या कार्यक्रमात एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.

Sangli Crime news: सांगलीच्या गारपीर चौकात मंगळवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. सांगलीतील दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची एका गुंडांच्या टोळक्याने निर्घृणपणे हत्या (Murder News) केली. उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यासाठी गारपीर चौक परिसरातील उत्तम मोहिते (Uttam Mohite Murder) यांच्या घराच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत मांडव टाकून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठ जणांच्या टोळक्याने चाकू, लोखंडी रॉड, काठी आणि धारदार शस्त्रांनी वार करुन उत्तम मोहिते यांची हत्या केली. गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले अशी या आठ आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण सांगली शहरातील इंदिरानगर भागात राहणारे आहेत. (Sangli News)

आठ जणांचे हे टोळके उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असलेल्या ठिकाणी गेले. याठिकाणी मोहिते यांनी आपले मित्र आणि नातेवाईकांसाठी जेवण ठेवले होते. गणेश मोरे आणि त्याचे टोळके याठिकाणी आले. त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आत सोडण्यावरुन वाद झाला. उत्तम मोहिते यांच्या पुतण्याने गणेश मोरे याला समजवण्याचा प्रयत्न केला.  गणेश मोरे याने थोड्यावेळाने त्याचे मित्र सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, समीर ढोले यांचेसह चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे व काठी घेवुन फिर्यादीचे घरात शिरून फिर्यादीचा नवरा उत्तम जिन्नाप्पा मोहिते (वय 38 वर्षे), यांचे पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात, हातावर वार करुन गंभीर जखमी करून खुन केला आहे. तसेच त्यांची भांडणे सोडविण्यास फिर्यादीचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते (वय 21 वर्षे), (रा. सितारामनगर, एसटी स्टॅन्डजवळ सांगली) हा मध्ये गेला असता त्यालाही जिवंत ठेवत नाही, असे म्हणुन त्याच्या छातीवर गणेश मोरे याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

उत्तम मोहिते यांच्यावर आरोपींनी चाकु, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे व काठीने हल्ला केला. त्यांनी मोहिते यांच्या घरात घरात शिरून त्यांच्या  पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात, हातावर वार करून गंभीर जखमी करून खुन केला आहे. तसेच त्यांची भांडणे सोडविण्यास फिर्यादीचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते वय 21 वर्षे, रा सितारामनगर, एस टी स्टॅन्ड जवळ सांगली हा मध्ये गेला असता त्यालाही जिवंत ठेवत नाही असे म्हणुन त्याचे छातीवर गणेश मोरे याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Sangli news: उत्तम मोहितेंवर वार करताना चाकू शाहरुखच्या पायावर लागला, नस कापल्याने भळाभळा रक्त वाहिलं अन् मृत्यू

या घटनेत उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळक्यातील शाहरुख शेख या आरोपीचाही मृत्यू झाला. शाहरुख शेख हा मोहिते यांच्यावर वार करत असताना त्याच्या पायाला चाकू लागला. त्यामुळे त्याच्या पायाची नस कापली गेली. त्यामुळे शाहरुखच्या पायातून प्रचंड रक्तस्राव झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्याचाही मृत्यू झाला. यानंतर सांगली पोलिसांनी नागरिकांना गैरसमज आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहन केले आहे. आरोपी आणि मयत यांच्या जुनं भांडण होते. याच वादातून हा हल्ला करण्यात आला. सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद झाली आहे. आरोपी गणेश मोरे याच्याबद्दल सखोल तपास केल्यावर आणखी माहिती समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गणेश मोरे या परिसरात गुंडगिरी करत होता. काल त्याने माझ्या वडिलांची हत्या केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात माझ्या भावावरही हल्ला करण्यात आला. मात्र, त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप उत्तम मोहिते यांच्या मुलीने केला.

आणखी वाचा

बर्थडे पार्टीत आधी जेवणावर ताव मारला, शुभेच्छा द्यायला जवळ जाऊन धारदार हत्यारं काढली अन् उत्तम मोहितेंवर सपासप वार, सांगलीच्या गारपीर चौकात नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
Pune Crime News: शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
शाळेपासूनचं प्रेम, पण मुलीचा जीव दुसऱ्यावरच जडला; संतापलेल्या एक्स बॉयफ्रेंडने हॉस्टेलमध्ये घुसून तरुणाचा काढला काटा, पुण्यातील शॉकिंग घटना
Ramesh Mhatre: डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
डॉक्टरांना मारहाण प्रकरण! नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर उच्च न्यायालयाचा दिलासा; कठोर अटी अन् शर्तीसह चारही आरोपींना जामीन मंजूर, कोर्टात नेमकं काय घडलं?
Influencer Attacked: LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले
LIVE स्ट्रिमिंग करताना प्रसिद्ध इन्फ्ल्युएंसरवर गोळीबार, वर्दळीच्या ठिकाणी झाला हल्ला; मोटारसायकलवरुन हल्लेखोर पळाले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget